Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India: BCCI ने बदलला WTC फायनलचा संघ! 'या' 5 खेळाडूंना मिळाली संधी

Indian Squad for WTC Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final-2023) चा अंतिम सामना 7 जूनपासून लंडनमध्ये खेळवला जाणार आहे.

Manish Jadhav

Indian Squad for WTC Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final-2023) चा अंतिम सामना 7 जूनपासून लंडनमध्ये खेळवला जाणार आहे.

यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली असून, सलामीवीर रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. दरम्यान, बीसीसीआयने गुरुवारी एक मोठी घोषणा करत अन्य काही खेळाडूंचा संघात समावेश केला आहे.

ईशान आणि सर्फराजला संधी मिळाली

BCCI निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी (WTC फायनल) ऋतुराज गायकवाड, सर्फराज खान आणि ईशान किशन यांना स्टँडबाय खेळाडू म्हणून घोषित केले आहे.

गायकवाड आणि सर्फराजला विशेष फलंदाज म्हणून तर ईशान किशनला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून समावेश केला आहे.

बीसीसीआयने या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांना स्टँडबाय गोलंदाज म्हणून नियुक्त केले आहे.

द्रविड 23 मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे

डब्ल्यूटीसी फायनलसाठी बीसीसीआयने खास योजना आखली आहे. बीसीसीआयला इंग्लंडमध्ये होणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी अनेक दिवसांचे सराव सामने हवे आहेत, ज्यावर विचार सुरु आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid), प्रशिक्षक कर्मचारी आणि आयपीएल प्लेऑफमधून बाहेर पडलेले खेळाडू 23 मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली

दरम्यान, राहुल द्रविडसोबत काही खेळाडू लंडनला रवाना होणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार, 'राहुल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 23-24 मे च्या सुमारास लंडनला रवाना होईल. काही खेळाडू द्रविडसोबत जातील, ज्यांची आयपीएल मोहीम संपेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT