BCCI Dainik Gomantak
क्रीडा

Team India: T20 मालिकेपूर्वी बीसीसीआयने उचलले मोठे पाऊल, एक नाही तर...!

India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे, जी 3 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

Manish Jadhav

India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे, जी 3 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. यापूर्वी, भारतीय संघाने कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकली.

टीम इंडियाने कसोटीत 1-0 तर वनडेत 2-1 असा विजय मिळवला. आता संघ टी-20 मालिकाही जिंकण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, बीसीसीआयने एक मोठे पाऊल उचलले आहे.

त्रिनिदादमध्ये पहिला T20 सामना

दरम्यान, वनडे मालिकेत 2-1 ने विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाला (Team India) वेस्ट इंडिजविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. ही मालिका उभय संघांमध्ये 3 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे, ज्याचा पहिला सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे.

दुसरा आणि तिसरा सामना गयाना आणि त्यानंतर शेवटचे दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवले जातील. जिथे टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याच्या हातात आहे, तिथे वेस्ट इंडिज संघाचं कर्णधारपद रोव्हमन पॉवेल सांभाळणार आहे.

बीसीसीआयने एक मोठे पाऊल उचलले

मालिका सुरु होण्यापूर्वीच बीसीसीआयने मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुरुष क्रिकेटसाठी नव्हे, तर महिला क्रिकेटसाठी प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत.

बीसीसीआयने (BCCI) महिला क्रिकेट संघासाठी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी 10 ऑगस्ट ही अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे.

10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज यावेत, असे मंडळाने बुधवारी सायंकाळी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

अटी

गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी पहिली अट अशी आहे की, खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे किंवा त्याच्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे किंवा NCA कडून B प्रमाणित प्रशिक्षक आहे आणि त्याने 30 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत किंवा आंतरराष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे किंवा असणे आवश्यक आहे. T20 फ्रँचायझीचे प्रशिक्षक होते. हा प्रशिक्षक संघाच्या मुख्य प्रशिक्षकाला अहवाल देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT