Team India Dainik Gomantak
क्रीडा

BCCI Announced Schedule: टीम इंडियाच्या 2023-2024 हंगामातील वेळापत्रकाची घोषणा! भारतात रंगणार 16 सामन्यांचा थरार

Team India Schedule: बीसीसीआयने भारतीय संघाच्या मायदेशातील 2023-24 हंगामाच्या वेळापत्रकाची घोषणा केली असून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सारखे संघ वर्षभरात भारत दौरा करणार आहेत.

Pranali Kodre

BCCI announces Schedule of India Men's Cricket Team for International Home Season 2023-24:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी (25 जुलै) भारतीय पुरुष संघाच्या 2023-24 हंगामातील मायदेशातील सामन्यांचे वेळापत्रक घोषित केले आहे. भारतीय क्रिकेट संघ या हंगामात बराच व्यस्त राहाणार आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार भारतीय पुरुष क्रिकेट संघ या एका वर्षाच्या हंगामात भारतात एकूण 16 द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. यामध्ये 5 कसोटी, 3 वनडे आणि 8 टी20 सामन्यांचा समावेश आहे. तसेच वनडे वर्ल्डकपचाही समावेश आहे.

अमिताभ विजयवर्गीय, जयेंद्र सहगल आणि हरी नारायण पुजारी यांचा समावेश असलेल्या बीसीसीआयच्या टूर्स, फिक्स्चर्स आणि टेक्निकल कमिटीने रोटेशन पद्धतीनुसार सामन्यांची ठिकाणे निश्चित केली आहेत.

भारताचा मायदेशातील हा हंगाम वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या पूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने सुरु होईल. या वनडे मालिकेतील सामने मोहाली, इंदूर आणि राजकोट येथे होणार आहेत.

त्यानंतर भारतात वनडे वर्ल्डकप 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाईल. यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.

यानंतर भारतात पुढच्यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये सामने सुरू होतील. नवीन वर्षात भारतीय संघ मायदेशात सर्वात आधी अफगाणिस्तानविरुद्ध सामने खेळणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी20 मालिका होईल.

त्यानंतर पुढच्यावर्षी जानेवारीमध्ये इंग्लंडचा संघ भारत दौरा करणार असून या दौऱ्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील सामने अनुक्रमे हैदराबाद, विशाखापट्टणम, राजकोट, रांची आणि धरमशाला येथे खेळवले जाणार आहेत.

असे आहे भारताचे मायदेशातील 2023-24 हंगामाचे वेळापत्रक

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 2023

  • वनडे मालिका (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया)

  • 22 सप्टेंबर - पहिला सामना, मोहाली (वेळ - दु. 1.30 वाजता)

  • 24 सप्टेंबर - दुसरा सामना, इंदूर (वेळ - दु. 1.30 वाजता)

  • 27 सप्टेंबर - तिसरा सामना,राजकोट (वेळ - दु. 1.30 वाजता)

वनडे वर्ल्डकप 2023

  • 5 ऑक्टोबर - 19 नोव्हेंबर

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 2023

  • टी20 मालिका (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया)

  • 23 नोव्हेंबर - पहिला सामना, विशाखापट्टणम (वेळ - संध्या. 7 वाजता)

  • 26 नोव्हेंबर - दुसरा सामना, तिरुअनंतपुरम (वेळ - संध्या. 7 वाजता)

  • 28 नोव्हेंबर - तिसरा सामना, गुवाहाटी (वेळ - संध्या. 7 वाजता)

  • 1 डिसेंबर - चौथा सामना, नागपूर (वेळ - संध्या. 7 वाजता)

  • 3 डिसेंबर - पाचवा सामना, हैदराबाद (वेळ - संध्या. 7 वाजता)

अफगाणिस्तानचा भारत दौरा 2024

  • टी20 मालिका (भारत विरुद्ध अफगाणिस्तान) (वेळ अद्याप निश्चित नाही)

  • 11 जानेवारी - पहिला सामना, मोहाली

  • 14 जानेवारी - दुसरा सामना, इंदूर

  • 17 जानेवारी - तिसरा सामना, बंगळुरू

इंग्लंडचा भारत दौरा 2024

  • कसोटी मालिका (भारत विरुद्ध इंग्लंड) (वेळ अद्याप निश्चित नाही)

  • 25 - 29 जानेवारी - पहिला सामना, हैदराबाद

  • 2 - 6 फेब्रुवारी - दुसरा सामना, विशाखापट्टणम

  • 15 - 19 फेब्रुवारी - तिसरा सामना, राजकोट

  • 23 - 27 फेब्रुवारी - चौथा सामना, रांची

  • 7 ते 11 मार्च - पाचवा सामना, धरमशाला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT