Bartholomew Ogbeche Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: ओगबेचे याच्या हॅटट्रिकमुळे एफसी गोवा गारद

विजयासह गतविजेता हैदराबाद संघ पुन्हा अव्वल

Akshay Nirmale

Indian Super League Football: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या बार्थोलोम्यू ओगबेचे याने गुरुवारी रात्री प्रेक्षणीय हॅटट्रिक साधली. त्याच्या धडाक्यासमोर एफसी गोवा संघ गारद झाला आणि हैदराबाद एफसीने 3-1 फरकाने विजय नोंदवून गुणतक्त्यात पुन्हा अग्रस्थान मिळविले. त्यांनी स्पर्धेतील सलग पाचव्या विजयाची नोंद केली. (FC Goa Vs FC Hyderabad)

सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. गतविजेत्या हैदराबाद एफसीचा हा 13 सामन्यांतील दहावा, तर एफसी गोवाविरुद्ध सलग दुसरा विजय ठरला. त्यांचे आता 31 गुण झाले असून एक सामना कमी खेळलेल्या मुंबई सिटीपेक्षा ते एका गुणाने पुढे आहेत. एफसी गोवाचा हा सलग दुसरा, तर एकंदरीत सहावा पराभव ठरला. त्यामुळे 13 सामन्यानंतर त्यांचे 19 गुण व पाचवा क्रमांक कायम राहिला. पुन्हा एकदा कमजोर बचाव एफसी गोवाच्या पराभवास कारणीभूत ठरला.

हैदराबादचा स्पर्धेतील पुढील सामना 12 जानेवारीस चेन्नईयीन एफसीविरुद्ध होईल, तर गुवाहाटी येथे 15 जानेवारी एफसी गोवा नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध खेळेल.

ओगबेचे याचा झंझावात

ओगबेचे गतवेळच्या आयएसएल स्पर्धेत गोल्डन बूटचा मानकरी ठरला होता, पण यंदा त्याला विशेष सूर गवसला नव्हता. 12 लढतीत त्याने फक्त तीन गोल केले होते. गुरुवारी फातोर्ड्यात त्याने एफसी गोवाच्या कमजोर बचावाचा सुरेख लाभ उठवत तीन गोल डागले. ताकदवान हेडिंग साधत त्याने 20 व्या मिनिटास पहिला गोल केला. विश्रांतीला हैदराबाद संघ एका गोलने आघाडीवर होता. 54 व्या मिनिटास रेडीम ट्लांग याने एफसी गोवास बरोबरी साधून दिली. मात्र अखेरच्या 11 मिनिटांच्या खेळात यजमान संघाला ओगबेचे याचा धडाका रोखता आला नाही.

एफसी गोवाचा कमजोर बचावाची सुवर्णसंधी साधताना ओगबेचे याने गोलनेटसमोर ७९व्या मिनिटास गोल नोंदविला. 90 व्या मिनिटास त्याने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यावेळीही हेडिंगवरील फटक्याचा अंदाज एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज मोईरांगथेम याला अजिबात आला नाही.

दृष्टिक्षेपात

- हैदराबादचे एफसी गोवाविरुद्ध 8 लढतीत 3 विजय

- हैदराबादचा एफसी गोवावर यंदा लागोपाठ 2 विजय, सलग 4 सामने अपराजित

- फातोर्ड्यात एफसी गोवाचे 6 लढतीत 2 पराभव, अन्य 4 विजय

- बार्थोलोम्यू ओगबेचे याचे यंदा स्पर्धेतील 13 सामन्यांत 6 गोल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: फोंड्यात ज्वेलरी शॉपमधून 1.14 कोटींचे सोने लंपास; कर्मचाऱ्यांवरच संशयाची सुई

Penha De Franca: सफर गोव्याची! आपुलकीनं भरलेलं, साध्या लोकांचं गाव 'बिठ्ठोण'

Panaji: पणजी महापौरपदी 'रोहित'च, उपमहापौर 'आगशीकर'; नवनिर्वाचित नगरसेवकांनाही दिली शपथ

Goa Opinion: निवडणुकीच्या काळात लोकांना मोठमोठी 'आश्वासने' दिली जातात, नंतर त्या आश्वासनांची 'पूर्तता' कितपत होते?

Cotigao: मध्यरात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडला बिबट्या, अंधारामुळे पडला विहिरीत; वनखात्याचे अथक प्रयत्न यशस्वी

SCROLL FOR NEXT