Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: बर्मी-आर्मी ने विराटला केलं ट्रोल, भारतीय चाहत्यांना दाखवला इंगा

Virat Kohli: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला ट्रोल करण्याची बर्मी-आर्मी एकही संधी सोडत नाही.

दैनिक गोमन्तक

Team India Star Batsman Virat Kohli: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला ट्रोल करण्याची बर्मी-आर्मी एकही संधी सोडत नाही. विराटने आंतरराष्ट्रीय शतक झळकावून 1000 दिवस झाले आहेत. यातच बर्मी आर्मीने याबद्दल ट्विट करुन विराटला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु विराटच्या चाहत्यांनी त्यांना योग्य ती जागा दाखवून दिली. विराटने एकूण 70 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. तर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत फक्त दोनच फलंदाज त्याच्या पुढे आहेत, एक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग.

दरम्यान, सचिनने 100 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत, तर पाँटिंगच्या खात्यात 71 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. बर्मी-आर्मीने ट्विट करत म्हटले की, '1000 दिवस' यावरुन चाहत्यांना लगेच समजले की, हे ट्विट विराटला उद्देशून करण्यात आले होते. मग काय, यानंतर चाहत्यांनी बर्मी-आर्मीचा बँड वाजवला.

दुसरीकडे, एका ट्विटर युजरने लिहिले, 3532 दिवस झाले, इंग्लंडने (England) भारताविरुद्ध भारतामध्ये (India) कोणत्याही फॉरमॅटमध्ये मालिका जिंकलेली नाही. एका चाहत्याने लिहिले, ब्रिटनच्या राणीने एकही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली नाही. आणखी एका चाहत्याने आठवण करुन दिली की, विराटच्या खात्यात 70 शतके आहेत आणि फक्त दोनच फलंदाज त्याच्या पुढे आहेत. तरीही तो निवृत्त झाला तर किती फलंदाज त्याच्या जवळ पोहोचू शकतात?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT