Tanzim Hasan Sakib Dainik Gomantak
क्रीडा

'नोकरी करणाऱ्या पत्नीमुळे कुटुंब उद्ध्वस्त होते...' बांगलादेशी गोलंदाजाची महिलांविरोधी पोस्ट

Tanzim Hasan Sakib: सोशल मीडियावर त्याने महिलांबद्दल केलेल्या पोस्ट व्हायरल होत असून त्यामुळे त्याला खूप ट्रोल केले जात आहे.

Manish Jadhav

Tanzim Hasan Sakib Viral Post: बांगलादेशचा उदयोन्मुख स्टार खेळाडू तंजीम हसन साकिब याने आशिया चषक 2023 दरम्यान भारताविरुद्ध शानदार पदार्पण केले. त्याने आपल्या चमकदार कामगिरीसाठी भरपूर प्रशंसाही मिळविली.

मात्र, आता तंजीमच्या अडचणी वाढल्या आहेत. सोशल मीडियावर त्याने महिलांबाबत केलेली पोस्ट व्हायरल होत असून त्यामुळे त्याला खूप ट्रोल केले जात आहे.

दरम्यान, पदार्पणाच्या सामन्यात रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांच्यासह महत्त्वपूर्ण विकेट्स घेऊन प्रकाशझोतात आलेला तंजीम हसन मोठ्या ट्रोलिंगचा सामना करत आहे, त्याने मागील काही फेसबुक पोस्टमध्ये महिलांबद्दल (Women) अपमानास्पद टिप्पणी केल्या आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.

तंजीमने ही महिलाविरोधी पोस्ट केली होती

गेल्या वर्षी फेसबुकवर (Facebook) केलेल्या एका पोस्टमध्ये तंजीमने लिहिले होते की, “जर पत्नी काम करत असेल तर पतीचे हक्क सुनिश्चित केले जात नाहीत. जर पत्नी काम करत असेल तर मुलाचे हक्क सुनिश्चित केले जात नाहीत.

पत्नी नोकरी करत असेल तर तिचे सौंदर्य बिघडते. पत्नी नोकरी करत असेल तर कुटुंब उद्ध्वस्त होते. पत्नी नोकरी करत असेल तर कुटुंब उद्ध्वस्त होते. पत्नी नोकरी करत असेल तर समाज उद्ध्वस्त होतो.''

दुसरीकडे, सोशल मीडियावर अनेक महिलांनी अशा अपमानास्पद पोस्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत. बीसीबी या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि ते योग्य वेळी वक्तव्य करतील, असे सांगण्यात आले आहे.

मात्र, यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे. आशिया चषक दरम्यान त्याच्या संस्मरणीय पदार्पणानंतर, ज्यामध्ये त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला बाद केले, मात्र आता त्याला त्याच्या सोशल मीडियावरील टिप्पण्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT