Bangladesh Cricket team Dainik Gomantak
क्रीडा

बांगलादेशच्या स्टार अष्टपैलू खेळाडूवर ICC ने बंदी घातली, 'या' प्रकरणात आढळला दोषी

Bangladesh All Rounder Banned by ICC: बांगलादेशच्या एका स्टार क्रिकेटपटूवर आयसीसीने दोन वर्षांची बंदी घातली आहे.

Manish Jadhav

Bangladesh All Rounder Banned by ICC: बांगलादेशच्या एका स्टार क्रिकेटपटूवर आयसीसीने दोन वर्षांची बंदी घातली आहे. या खेळाडूने आपल्या देशासाठी 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये या क्रिकेटपटूला आयसीसीने आरोपी बनवले होते. आता या अष्टपैलू खेळाडूवर तीन आरोप सिद्ध झाले आहेत. या आरोपावरुन आयसीसीने त्याच्यावर 2 वर्षांची बंदी घातली आहे. नासिर हुसैन असे या क्रिकेटपटूचे नाव असून त्याने हे सर्व आरोप मान्य केले आहेत. आता त्याच्यावर ही बंदी 7 एप्रिल 2025 पर्यंत लागू राहील.

काय होतं संपूर्ण प्रकरण?

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू नासिर हुसैनला एका अज्ञात व्यक्तीने गिफ्ट दिले होते. त्यासाठी त्याच्याकडे विशेष मागणीही करण्यात आली होती. मात्र, त्याने यासंबंधीची माहिती ना बोर्डाला दिली ना लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याला. त्यानंतर तपास सुरु झाल्यानंतरही त्याने अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य केले नाही. त्यामुळे त्याच्यावर आता 2 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

नासिर हुसैन याच्यावर हे 3 आरोप

कलम 2.4.3 चे उल्लंघन – नासिरला आयफोन 12 च्या रुपात US$ 750 पेक्षा जास्त किमतीचे गिफ्ट देण्यात आले होते. याची माहिती त्याने लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांना दिली नाही.

कलम 2.4.4 चे उल्लंघन – नासिरने लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याला अज्ञात व्यक्तीने संपर्क केल्याची माहिती दिली नाही. याशिवाय, भ्रष्टाचाराशी संबंधित माहिती अधिकाऱ्याला न दिल्याबद्दलही तो दोषी आढळला.

कलम 2.4.6 चे उल्लंघन- लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याकडून प्रकरणाचा तपास सुरु असताना, नासिरने त्यांना सहकार्य केले नाही. याशिवाय, त्यांना यासंबंधी महत्त्वाची माहिती देण्यातही तो अपयशी ठरला. यासंबंधीची कोणतीही कागदपत्रेही त्याने अधिकाऱ्याला दिली नाहीत.

कसा होता नासिर हुसैनचा करिअर रेकॉर्ड?

नासिर हुसैनने बांगलादेशकडून 19 कसोटी सामने खेळले आणि 8 विकेट घेतल्या आणि 1044 धावा केल्या. कसोटीत त्याच्या नावावर 1 शतक आणि 6 अर्धशतके आहेत. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात नासिर हुसैनने 65 सामने खेळले आणि 24 बळी घेतले आणि 1 शतक आणि 6 अर्धशतकांसह 1281 धावा केल्या. तर 31 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 371 धावा केल्या आणि 7 विकेट घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT