New Zealand Team  Dainik Gomantak
क्रीडा

BAN vs NZ: बांगलादेशचा न्यूझीलंडकडून 15 वर्षांनी घरच्या मैदानावर पराभव, ईश सोढी ठरला 'मॅचविनर'

BAN vs NZ: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला आहे.

Manish Jadhav

BAN vs NZ: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला आहे. हा विजय न्यूझीलंडसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे.

न्यूझीलंड संघाला तब्बल 15 वर्षांनंतर वनडे फॉरमॅटमध्ये एकदिवसीय सामना जिंकण्यात यश आले आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाला 49.2 षटकांत सर्व गडी गमावून 254 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 41.1 षटकांत केवळ 168 धावाच करु शकला. न्यूझीलंड संघाने हा सामना 86 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, 255 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची (Bangladesh) सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार लिटन दास 6 धावा करुन बाद झाला. यानंतर तनजीद हसनला केवळ 16 धावा करता आल्या. सौम्या सरकार खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.

हरिदो 4 धावा करुन बाद झाला. ईश सोढीने या खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सलामीवीर तमिम इक्बालने 58 चेंडूत 44 धावा केल्या. बांगलादेशने 100 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या.

मेहदी हसनने 29 चेंडूत 17 धावा केल्या. बांगलादेशकडून महमुदुल्लाहने सर्वाधिक धावा केल्या. महमुदुल्लाहने 76 चेंडूत 49 धावांची खेळी खेळली. न्यूझीलंडकडून ईश सोढीने सर्वाधिक 6 बळी घेतले. सोढीने 10 षटकात 39 धावा देत 6 बळी घेतले.

दुसरीकडे, न्यूझीलंडची (New Zealand) सुरुवातही चांगली झाली नाही. विल यंग खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. फिन ऍलनने 12 धावा केल्या. बोसने 14 धावांची खेळी खेळली. यानंतर हेन्री निकोल्स आणि टॉम ब्लंडेल यांच्यात 95 धावांची शानदार भागीदारी झाली.

हेन्री 49 धावा करुन बाद झाला. रचिन रवींद्रला केवळ 10 धावा करता आल्या. टॉम ब्लंडेलने 66 चेंडूत 68 धावा केल्या. ईश सोढीने 39 चेंडूत 35 धावा केल्या. जेमसनने 20 धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून मेहदी हसन आणि खालिद अहमद यांनी 3-3 बळी घेतले.

बांगलादेशच्या भूमीवर 15 वर्षांनंतर एकदिवसीय सामना जिंकण्यात न्यूझीलंड संघाला यश आले आहे. यापूर्वी 14 ऑक्टोबर 2008 रोजी न्यूझीलंडने बांगलादेशचा 79 धावांनी पराभव केला होता. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडचा संघ बांगलादेशला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करु शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT