कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ  Dainik Gomantak
क्रीडा

डिचोलीत बॅडमिंटन कार्यशाळेला उत्साहात प्रारंभ

एक आठवडा चालणाऱ्या या कार्यशाळेत (workshop) प्रशिक्षक खेळाडूंना बॅडमिंटन (Badminton) खेळातील शिस्त, बारकावे या विषयी मार्गदर्शन करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

डिचोली: बोर्डे बॅडमिंटन क्लबतर्फे (Borde Badminton Club) आयोजित बॅडमिंटन प्रशिक्षण कार्यशाळेला डिचोलीत उत्साहात प्रारंभ झाला आहे. शिक्षा व्हिजन, डिचोलीच्या सहकार्याने बोर्डे येथील हावजिंग बोर्ड कॉलनी येथील चिल्ड्रन पार्कमध्ये ही कार्यशाळा घेण्यात येत असून, या कार्यशाळेत (workshop) 30 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. एक आठवडा चालणाऱ्या या कार्यशाळेत प्रशिक्षक (Trainer) शुभम देसाई, सय्यद अत्तर आणि रश्मीर मातोणकर हे खेळाडूंना बॅडमिंटन खेळातील शिस्त, बारकावे आदीविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

उदघाटन सोहळा मुळगाव येथील ज्ञानविकास मंडळ उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. मंगेश परब यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले.

झांट्ये महाविद्यालयाचे (college) शारीरिक शिक्षक प्रा. सत्यवान हरमलकर, आयोजक संस्थेचे डॉ. प्रवीण सावंत, प्रशिक्षक शुभम देसाई, सय्यद अत्तर, सुमंथ नाईक आणि सुधीर वालावलकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंगेश परब आणि सत्यवान हरमलकर यांनी खेळाचे महत्व विशद केले. सूत्रसंचालन डॉ. सावंत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT