मिश्र दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या तनिशा क्रास्टो व ईशान भटनागर (दोघेही मध्यभागी) यांना करंडक देताना मान्यवर. Dainik Gomantak
क्रीडा

तनिशा क्रास्टोचे दुहेरीत यश

तनिशा क्रास्टो आहे राष्ट्रीय मिश्र दुहेरीतील विजेती

Dainik Gomantak

Badminton: बंगळूर येथील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन (International Challenge Badminton) स्पर्धेत गोव्याच्या तनिशा क्रास्टो (Tanisha Crasto) हिने दुहेरीत यश मिळविले. तिने मिश्र दुहेरीत छत्तीसगडचा ईशान भटनागर (Ishan Bhatnagar) याच्यासमवेत विजेतेपद, तर महिला दुहेरीत ओडिशाची ऋतुपर्णा पांडा हिच्यासमवेत उपविजेतेपद प्राप्त केले. तनिशाने हल्लीच सीनियर पातळीवर भारताचे सुदिरमन कप, तसेच थॉमस-उबेर कप स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. ती सध्याची राष्ट्रीय मिश्र दुहेरीतील विजेती आहेत.

बंगळूरमधील स्पर्धेतील अंतिम लढती रविवारी झाल्या. मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत तनिशा व ईशान जोडीने भारताच्याच के. साई प्रणित व गायत्री गोपीचंद पुल्लेला जोडीवर 21-16, 21-19 फरकाने मात केली. महिला दुहेरीतील अंतिम लढतीत तनिशा व ऋतुरपर्णा जोडीस ट्रिसा जॉली व गायत्री गोपीचंद पुल्लेला जोडीकडून 23-21, 21-14 फरकाने हार पत्करावी लागली. पुरुष एकेरीत प्रियांशू राजावत याने, तर महिला एकेरीत अनुपमा उपाध्याय यांनी विजेतेपद प्राप्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT