Malaysian Batsman Breaks Babar Azam World Record Dainik Gomantak
क्रीडा

मलेशियाच्या 24 वर्षीय खेळाडूने मोडला बाबर आझमचा वर्ल्ड रेकॉर्ड!

Malaysian Batsman Breaks Babar Azam World Record: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या एकदिवसीय विश्वचषक 2023 चा भाग आहे.

Manish Jadhav

Malaysian Batsman Breaks Babar Azam World Record: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या एकदिवसीय विश्वचषक 2023 चा भाग आहे. त्याच्या कर्णधारपदासह त्याच्या कामगिरीवर सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मात्र गेल्या दोन वर्षांत त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ टी-20 विश्वचषकात उपविजेता ठरला आहे. बाबरच्या नावावर T20 क्रिकेटमध्ये 41.4 च्या सरासरीने 3485 धावा आहेत. या यादीत विराट कोहली सर्वाधिक 4008 धावांसह अव्वल स्थानावर आहे. पण बाबर आझमच्या नावावर एक विश्वविक्रमही होता जो मलेशियाच्या फलंदाजाने मोडला आहे.

24 वर्षीय खेळाडूने विश्वविक्रम मोडला

दरम्यान, मलेशियाचा (Malaysia) संघ 2024 टी-20 विश्वचषक पात्रता फेरीच्या 7 व्या सामन्यात नेपाळविरुद्ध खेळण्यासाठी आला होता. या सामन्यात मलेशियाच्या वीरनदीप सिंगने केवळ 4 धावा केल्या. पण तरीही त्याने शेवटच्या ओमानविरुद्धच्या सामन्यात 2000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या.

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 2000 चा टप्पा पार करणारा तो 25 वा खेळाडू आहे. तर वयाच्या 24 व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली. यासह वीरनदीप 2000 आंतरराष्ट्रीय टी-20 धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. सर्वात जलद 2000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करण्यासाठी वीरनदीपने बाबर आझमला मागे टाकले. बाबरने वयाच्या 26 व्या वर्षी हा विक्रम केला होता.

वीरनदीप सिंगचा जलवा

वीरनदीप सिंगने 4 वर्षे आणि 128 दिवसांमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. तर बाबर आझमने (Babar Azam) 4 वर्षे 230 दिवसांत हा आकडा गाठला होता. बाबर आझम टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

तर वीरनदीप सिंगने 66 व्या सामन्यातील 65 व्या डावात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 1 शतक आणि 13 अर्धशतके आहेत. त्याची सरासरी 37 च्या वर असून स्ट्राइक रेट 127.37 आहे.

या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, मलेशियाला पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना मलेशियाने 20 षटकांत 9 गडी गमावून 165 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेपाळने 18 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले आणि सामना 6 विकेटने जिंकला.

नेपाळमध्ये 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी सुरु आहे. त्यात आठ संघ सहभागी होत आहेत. यापैकी, एकूण दोन संघ वेस्ट इंडिज आणि यूएसए येथे होणाऱ्या विश्वचषक 2024 साठी पात्र ठरतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT