Virat, Rohit Dainik gomantak
क्रीडा

IND vs PAK: रोहित-विराटचे बल्ले-बल्ले! पाक संघातून भारताचा हा दुश्मन आऊट

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर महामुकाबला होणार आहे.

दैनिक गोमन्तक

India vs Pakistan T20 World Cup 2022: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर महामुकाबला होणार आहे. तमाम क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या शानदार सामन्यावर खिळल्या आहेत. पण या सामन्यातून भारतीय चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पाकचा एक स्टार खेळाडू फिट नसल्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. चला तर जाणून घेऊया या खेळाडूबद्दल.

हा खेळाडू भारताविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, 'फखर जमान भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.' सध्या ते रिहॅबिलिटेशनच्या प्रक्रियेतून जात असल्याचे त्याने सांगितले. मात्र भारताविरुद्धच्या सामन्यात स्टार फलंदाज शान मसूद उपलब्ध असेल. फखर जमान भारताविरुद्धच्या (India) सामन्यातून बाहेर होताच चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

भारताकडून ट्रॉफी हिसकावून घेतली

फखर जमानची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. 2017 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला पराभूत करण्यात फखर जमानने महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे भारताचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्नही भंगले होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने 114 धावा केल्या होत्या. त्यामुळे फायनलमध्ये टीम इंडियाला 180 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

पाकिस्तानने अनेक सामने जिंकले

फखर जमान पाकिस्तान (Pakistan) संघाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळतो. त्याने पाकिस्तान संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. त्याने 3 कसोटी सामन्यात 192 धावा, 62 एकदिवसीय सामन्यात 2628 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 71 टी-20 सामन्यांमध्ये 1349 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत भारताविरुद्ध फखर जमानसारख्या घातक फलंदाजाला न खेळणे टीम इंडियासाठी खूप फायदेशीर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT