Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

Babar Azam: 'जेव्हा कोहलीसारखा खेळाडू...' भारत-पाक मॅचआधी बाबरकडून विराटवर स्तुतीसुमनांचा वर्षाव

Babar Azam on Virat Kohli: आशिया चषकातील भारत वि. पाकिस्तान सामन्यापूर्वी बाबर आझमने विराटशी झालेल्या भेटीच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.

Pranali Kodre

Babar Azam Praise Virat Kohli:

आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरुवात झाली असून चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान संघात होणाऱ्या सामन्याची उत्सुकता आहे. हा सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना कँडीमधील पाल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.

दरम्यान, या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे कौतुक केले आहे. तसेच विराटकडून शिकायला मिळालेल्या गोष्टींबद्दलही सांगितले आहे. बाबरने 2019 मध्ये विराटशी झालेल्या भेटीच्या आठवणीला उजाळाही दिला.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना बाबर म्हणाला, 'मी विराट कोहलीकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. जेव्हा कोहलीसारखा मोठा खेळाडू तुमच्याबद्दल बोलतो, तेव्हा तुम्हाला मोठा विश्वास मिळतो. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.'

'मी 2019 मध्ये विराट कोहलीला भेटलो होतो. तो यशाच्या शिखरावर होता. आताही तो त्याच्या शिखरावरच आहे. मी त्याला फलंदाजी दृष्टीकोनाबद्दल काही प्रश्न विचारले आणि त्यानेही मला तपशीलवार सर्व समजावून सांगितले. मला त्याच्याकडून खूप मदत मिळाली.'

विराटने गेल्यावर्षी बाबरचे कौतुक केले होते. विराट म्हणाला होता, 'पहिल्या दिवसापासून त्याच्याकडून आदर मिळाला आहे. याक्षणी तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असला, तरी त्यात काहीही बदलले नाही.'

'सर्व प्रकारात खेळण्यासाठी त्याच्याकडे क्षमता आहे आणि मला त्याला फलंदाजी करताना पाहायला आवडते. मोठा खेळाडू बनल्यानंतरही त्याचा दृष्टीकोन बदललेला नाही असे खेळाडू खूप पुढे जातात.'

दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावेळी बाबरला रोखण्याचा तोडगा भारतीय संघाला शोधावा लागणार आहे. कारण बाबरने आशिया चषकात नेपाळविरुद्धच्या सामन्यात 151 धावांची खेळी केली होती. तसेच तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 2 सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT