Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

ICC च्या 'या' लिस्टमध्ये बाबर आझमने जो रुटला सोडले मागे; टॉप-5 मध्ये एकही भारतीय नाही

Babar Azam: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझम नव-नवीन शिखरे सर करत आहे.

Manish Jadhav

Babar Azam: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझम नव-नवीन शिखरे सर करत आहे. या मालिकेत, ICC ने गुरुवारी ऑगस्ट महिन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मंथ' नामांकनांची घोषणा केली, तेव्हा त्याने यातही एक विक्रम केला.

बाबर आझमला पाचव्यांदा नामांकन मिळाले असून तो सर्वाधिक वेळा नॉमिनेट होणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, बाबरला दोनदा हा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक नॉमिनेट क्रिकेटपटूंच्या टॉप 5 यादीत एकही भारतीय नाही.

बाबरच्या निशाण्यावर आणखी एक विक्रम

वास्तविक, ही यादी पुरुष आणि महिला क्रिकेटर यांची एकत्रित यादी आहे. या टॉप 5 च्या यादीत एकही भारतीय पुरुष किंवा महिला क्रिकेटपटू नाही. तर बाबर आझम आता जो रुटला मागे टाकून अव्वल स्थानावर आला आहे.

बाबर आझमला (Babar Azam) पाचव्यांदा नॉमिनेशन मिळाले असून आता त्याची नजर तिसऱ्या विजेतेपदावर असेल. याआधी बाबर आझम आणि शाकिब अल हसन यांनी प्रत्येकी दोनदा हा पुरस्कार पटकावला आहे.

म्हणजेच, बाबरने यावेळी हा पुरस्कार जिंकला तर तो शाकिबला मागे टाकून हा पुरस्कार सर्वाधिक वेळा जिंकण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर येईल.

सर्वाधिक वेळा प्लेयर ऑफ द मंथचे नॉमिनेशन

5 - बाबर आझम (पाकिस्तान)

4 - जो रुट (इंग्लंड)

4 - एश्लेग गार्डनर (ऑस्ट्रेलिया महिला संघ)

4 - गॅबी लुईस (आयर्लंड महिला संघ)

4 -  नेट सीवर ब्रंट (इंग्लंड महिला संघ)

बाबर आझमसमोर या दोन खेळाडूंचे आव्हान आहे

बाबर आझमला पाचव्यांदा प्लेअर ऑफ द मंथसाठी नॉमिनेशन मिळाले आहे. ऑगस्ट 2023 साठी ICC द्वारे बाबरसोबत अजून दोन खेळाडू नॉमिनेट झाले आहेत.

वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज निकोलस पूरन आणि बाबर आझमचा देशबांधव पाकिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू शादाब खान यालाही नॉमिनेशन मिळाले आहे.

बाबरला तिसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकून विक्रम करायचा असेल, तर त्याला या दोन खेळाडूंच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मात्र, बाबरचा अलीकडचा फॉर्म जबरदस्त असून काही दिवसांतच त्याने पाच डावांत दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.

आता आयसीसी पॅनल आणि मतदानाच्या आधारे यावेळेस प्लेअर ऑफ द मंथ साठी कोणाची निवड होणार हे पाहायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT