Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2022 मधील खराब फॉर्मवर बाबर आझमने सोडले मौन, 'रिझवान खरा योद्धा'

Babar Azam: बाबरने संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला 'खरा योद्धा' म्हटले.

दैनिक गोमन्तक

Pakistan Team Captain Babar Azam: पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने आशिया कप 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सहकारी खेळाडूंचे कौतुक केले. बाबरने संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला 'खरा योद्धा' म्हटले. सध्या सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील खराब फॉर्मबद्दलही बाबरने सांगितले. याशिवाय आता पाकिस्तानी संघ ज्या प्रकारे एकजुटीने खेळत आहे, तेच संघाचे बलस्थान बनल्याचे बाबर म्हणाला.

दरम्यान, बाबर रिजवानबद्दल म्हणाला, 'मी इतका विस्फोटक फलंदाज पाहिला नाही. गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकातही (T-20 World Cup) तो रुग्णालयात होता. कर्णधार म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की, आमच्याकडे रिझवानसारखा फलंदाज आहे.'

तसेच, बाबरने आपल्या फॉर्मबद्दल सांगितले की, 'एक खेळाडू म्हणून माझ्या मनात सारखे येते की, मलाही मोठी धावसंख्या उभारायची आहे, पण तुम्ही प्रत्येक सामन्यात धावा करु शकत नाही. हा खेळाचा एक भाग आहे. फॉर्ममध्ये कमी-जास्त होऊ शकते. तुम्ही प्रत्येक सामन्यात मोठी धावसंख्या कराल असे कुठेही लिहिलेले नाही. अशा वेळी, तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे महत्त्वाचे आहे. माझा स्वतःवर विश्वास आहे, अल्लाहवर विश्वास आहे, माझ्यासाठी जे लिहिले आहे ते होईल.'

शिवाय, या पाकिस्तानी संघाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, गोलंदाज आणि फलंदाज जबाबदारी घेण्यास तयार असतात. कोणी कोणाला दोष देत नाही, असेही बाबर म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT