Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2021: बाबर आझमने मोडला 14 वर्ष जुना विश्वविक्रम, विराटही थक्क!

बाबरने विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम मोडला. विराटने 68 डावात 2500 टी-20 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) जेव्हा- जेव्हा क्रीझवर येतो तेव्हा अनेकदा त्याच्या बॅटने विक्रम मोडीत काढले आहेत. असेच काहीसे T20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत घडले, जेव्हा पाकिस्तानी कर्णधाराने 14 वर्षे जुना विश्वविक्रम मोडला. बाबर आझमने आपल्या पदार्पणाच्या टी-ट्वेन्टी विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. बाबर आझमने 265 धावांचा टप्पा पार करताच हा विश्वविक्रम त्याच्या नावावर झाला.

दरम्यान, आश्चर्याची बाब म्हणजे बाबर आझमने 2021 च्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडनचा (Matthew Hayden) विक्रम मोडला आहे. मॅथ्यू हेडनने 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हा पराक्रम केला होता. यासोबतच बाबर आझम सध्याच्या टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. तत्पूर्वी, जोस बटलर (Jose Butler) 269 धावांसह अव्वल होता, परंतु बाबरने त्याला मागे सोडले. बाबर आझमच्या T20 इंटरनॅशनलमध्येही 2500 धावा पूर्ण झाल्या होत्या. त्याने हा पराक्रम अवघ्या 62 डावात केला जो हा एक विश्वविक्रम आहे. बाबरने विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम मोडला. विराटने 68 डावात 2500 टी-20 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT