Yuzvendra Chahal Instagram
क्रीडा

Yuzvendra Chahal च्या आयकॉनिक पोजमध्ये आवेश खान आणि अक्षर पटेल; फोटो व्हायरल

युजवेंद्र चहलच्या आयकॉनिक पोजमधील आवेश खान आणि अक्षर पटेल यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यात अक्षर पटेलने शानदार खेळाचे दर्शन घडवले. सर्वोत्तम खेळासाठी अक्षर पटेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तसेच भारतीय संघाने 3 वनडे सामन्यांची मालिका जिंकली. त्याचवेळी, या सामन्यानंतर आवेश खान आणि अक्षर पटेल यांनी युझवेंद्र चहलसोबत (Yuzvendra Chahal) मैदानावर खूप धमाल केली. (IND vs WI 2022 News)

* युझवेंद्र चहलची आयकॉनिक पोझ

भारतीय क्रिकेट संघाने (Team India) आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून एक फोटो (Photo) शेअर केला आहे. या फोटोमध्ये आवेश खान, अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल दिसत आहेत. या फोटोमध्ये तिन्ही खेळाडू युजवेंद्र चहलच्या आयकॉनिक पोजमध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर या फोटोच्या कॅप्शनमध्ये युजी इतरांनाही युजींसारखे काम करायला शिकवत असे लिहिले आहे. या तिघांमधील मजेदार संवाद लवकरच बीसीसीआय (BCCI TV) टीव्हीवर पाहायला मिळणार आहे.

* अक्षर पटेलला सामनावीर घोषित करण्यात आले

विशेष म्हणजे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 2 गडी राखून पराभव केला. एकेकाळी भारतीय संघ या सामन्यात पिछाडीवर पडल्याचे दिसत होते. पण श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनने डाव सांभाळला. त्याचवेळी अक्षर पटेलने महत्त्वपूर्ण खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. अशाप्रकारे भारतीय संघ 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पुढे गेला आहे. या मालिकेतील शेवटचा सामना अजून खेळायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT