Shaun Marsh and Usman Khawaja Dainik Gomantak
क्रीडा

India vs Australia कसोटी मालिका सुरू असतानाच दिग्गज ऑसी खेळाडूची निवृत्तीची घोषणा

भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरू असतानाच ऑस्ट्रेलियाच्या 39 वर्षीय दिग्गज खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Pranali Kodre

Shaun Marsh Retirement from First Class Cricket: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा 39 वर्षीय खेळाडू शॉन मार्शने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने सातत्याच्या दुखापतींमुळे हा निर्णय घेतला आहे.

शॉन मार्शने जवळपास 22 वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. त्याने वयाच्या 17 व्या वर्षी 2001 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 22 वर्षात 183 प्रथम श्रेणी सामने खेळताना 41.20 च्या सरासरीने 32 शतके आणि 58 अर्धशतके करताना 12032 धावा केल्या.

तसेच त्याने 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून खेळताना 38 कसोटी सामन्यांमध्ये 34.31 च्या सरासरीने 2265 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतकांचा आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

त्याने त्याचा अखेरचा कसोटी सामना भारताविरुद्ध जानेवारी 2019 मध्ये खेळला. त्याने त्याच्या कारकिर्दीत सर्वाधिक प्रथम श्रेणी धावा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळताना काढल्या आहेत.

त्याच्या निवृत्तीबद्दल वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने माहिती दिली. मार्शने वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी गेल्यावर्षी पहिल्यांदा शेफिल्ड शिल्ड स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी त्याने त्याचा भाऊ मिशेल मार्शच्या अनुपस्थितीत अंतिम सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे नेतृत्वही केले होते.

दरम्यान, यानंतर त्याने आणखी एक देशांतर्गत क्रिकेट हंगाम खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दुखापतीमुळे तो 2022-23 हंगामातील शेफिल्ड शिल्डचा एकच सामना खेळू शकला. अखेर त्याने सातत्याच्या दुखापतींमुळे प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.

त्याने निवृत्तीबद्दल सांगितले की 'हे वर्ष थोडे कठीण राहिले आहे. नक्कीच गेल्यावर्षी शिल्ड जिंकल्यानंतर मी विचार केल्याप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत. मला आशा होती की मी आणखी एक शिल्ड जिंकेल. पण दुखापतींमुळे हे शक्य झाले नाही.'

मार्शने सांगितले की मंगळवारी काही वेळ सराव केल्यानंतर त्याच्या लक्षात आले की त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. दरम्यान असे असले तरी तो आगामी बिग बॅश लीग खेळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

SCROLL FOR NEXT