Australia Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

Australia Cricket Team: ICC स्पर्धेत कांगारुंच 'वर्चस्व'! जिंकलेत तब्बल 21 विजेतीपदं; लिस्ट एकदा पाहाच

ऑस्ट्रेलियाच्या संघाने आत्तापर्यंत तब्बल 21 आयसीसी विजेतीपदं नाववार केली आहेत.

Pranali Kodre

Women's T20 World Cup: रविवारी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने तब्बल सहाव्यांदा महिला टी20 वर्ल्डकप विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने महिला टी20 वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्यात यजमान दक्षिण अफ्रिकन महिला संघाला 19 धावांनी पराभूत केले. त्यामुळे पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व दिसून आले आहे.

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना बेथ मूनीच्या 74 धावांच्या खेळीच्या जोरावर 156 धावा उभारल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते.

पण या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला लॉरा वोल्वार्डच्या 61 धावांच्या खेळीनंतरही 20 षटकात 6 बाद 137 धावाच करता आल्या.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन महिला संघाचा हा महिला टी20 वर्ल्डकपमधील सलग सातवा अंतिम सामना होता. त्यांनी 2010, 2012, 2014, 2016, 2018, 2020 आणि 2023 साली अंतिम सामने खेळले असून केवळ 2016 सालचा वर्ल्डकप वगळता अन्य सहाही अंतिम सामन्यात विजय मिळवत विजेतेपद नावावर केले आहे.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन वरिष्ठ महिला संघाचे हे एकूण 13 वे आयसीसी विजेतेपद ठरले आहे. त्यांनी सातवेळा महिला वनडे वर्ल्डकपवरही नाव कोरले आहे. त्यांनी 1978, 1982, 1988, 1997, 2005, 2013 आणि 2022 या सात वर्षी झालेल्या वनडे वर्ल्डकपवर नाव कोरले आहे.

त्यामुळे आता आयीसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे वर्चस्व दिसून येत आहे. कारण ऑस्ट्रेलिया हा पहिला असा संघ आहे, ज्यांनी 20 पेक्षा अधिक आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद नावावर केले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ पुरुष संघानेही आत्तापर्यंत आयसीसी स्पर्धांमधील एकूण 8 विजेतीपदे आपल्या नावावर केली आहेत. पुरुष संघाने 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 वर्षी वनडे वर्ल्डकपवर नाव कोरले आहे. तसेच त्यांनी 2021 साली टी20 वर्ल्डकपही जिंकला होता. याशिवाय ऑस्ट्रेलियाने 2006 आणि 2009 साली झालेली चॅम्पियन्सन ट्रॉफी देखील जिंकली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघांची आयसीसी विजेतीपदे -

महिला संघ -

वनडे वर्ल्डकप: 1978, 1982, 1988, 1997, 2005, 2013, 2022

टी20 वर्ल्डकप: 2010, 2012, 2014, 2018, 2020, 2023

पुरुष संघ -

वनडे वर्ल्डकप: 1987, 1999, 2003, 2007, 2015

चॅम्पियन्स ट्रॉफी: 2006, 2009

टी20 वर्ल्डकप: 2021

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT