Australian Women's Team Dainik Gomantak
क्रीडा

WWC 2022: कांगारुंची फायनलमध्ये धाकड एन्ट्री; वेस्ट इंडिजची उडाली गुगली

ऑस्ट्रेलियन महिला संघाने (Australian Women's Team) वेस्ट इंडिजच्या महिला संघाचा 157 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

दैनिक गोमन्तक

आयसीसी (ICC) महिला विश्वचषक 2022 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने वेस्ट इंडिजच्या महिला संघाचा 157 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. संघासाठी विकेटकीपर सलामीवीर अ‍ॅलिसा हिलीने (Alyssa Healy) स्फोटक फलंदाजी करताना 107 चेंडूत 129 धावांचे धाकड शतक झळकावले. या उत्कृष्ट कामगिरीसाठी हेलीला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरविण्यातही आले. (Australian women's team defeated the West Indies women's team in the semi-finals of the Women's World Cup 2022)

दरम्यान, वेलिंग्टनमध्ये आज वेस्ट इंडिज (West Indies) महिला संघाची कर्णधार शेमेन कॅम्पबेल हिने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन महिला संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. विरोधी संघाचे हे निमंत्रण स्वीकारुन ऑस्ट्रेलियन संघाने तीन गडी गमावून 305 धावा केल्या. हेलीशिवाय रॅचेल हेन्सने 85, ऍश गार्डनर 12, कॅप्टन मेग लॅनिंगने नाबाद 26 आणि बेथ मुनीने नाबाद 43 धावांचे योगदान दिले.

तसेच, ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंनी दिलेल्या 306 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कॅरेबियन महिला संघ 37 षटकांत अवघ्या 148 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियन महिला गोलंदाजांसमोर फक्त कर्णधार कॅम्पबेलच काही काळ मैदानावर टिकू शकली. संघासाठी 75 चेंडूंचा सामना करताना तिने चार चौकारांच्या मदतीने 48 धावांची सर्वोच्च खेळी उभारली. कॅम्पबेलशिवाय डिआंड्रा डॉटिन आणि हेली मॅथ्यूज यांनी संघासाठी अनुक्रमे 34-34 धावांचे योगदान दिले.

याशिवाय, जेस जोनासनने विजेत्या संघासाठी उपांत्य फेरीच्या सामन्यात गोलंदाजी करताना दोन विकेट्स मिळवल्या. जोनासन व्यतिरिक्त, मेगन शुट, अ‍ॅनाबेल सदरलँड, ताहलिया मॅकग्रा, अलाना किंग आणि ऍश गार्डनर यांनी प्रत्येकी संघासाठी यश मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

SCROLL FOR NEXT