Australian Open 2023| Aryna Sabalenka  Dainik Gomantak
क्रीडा

Australian Open 2023: सबलेन्काने जिंकले पहिले ग्रँडस्लॅम, कोचलाही आवरेना आनंदाश्रू; पाहा Video

ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेतील महिला एकेरीची विजेती आरिना सबलेन्का ठरली आहे.

Pranali Kodre

Australian Open 2023: ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद आरिना सबलेन्काने पटकावले. तिची शनिवारी रॉड लेवर एरिनामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिनाविरुद्ध लढत झाली होती. या लढतीत 4-6, 6-3, 6-4 अशा तीन सेटमध्ये तिने विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले.

पाचव्या मानांकित सबलेन्काचे हे महिला एकेरीतील पहिलेच ग्रँडस्लॅम आहे. तिने या सामन्यात पहिल्या सेटमध्ये पराभव स्विकारल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत विजय मिळवला. तिने विजय मिळवल्यानंतर तिच्यासह तिचे प्रशिक्षकही भावूक झाले होते. या विजेतेपदामुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही आले होते.

या सामन्यात पहिल्या सेटमध्ये सबलेन्काने पहिल्याच गेममध्ये चांगली सुरुवात केल्यानंतरही रायबाकीनाने लगेचच पुनरागमन करत वर्चस्व गाजवायला सुरुवात केली होती. तिने पहिल्या सेटमध्ये 3-1 अशी आघाडीही घेतली होती.

त्यानंतर सबलेन्काने 3-2 असे पुनरागमन केले होते. या दोघींमध्ये नंतर चांगली चूरस पाहायला मिळाली. रायबाकिनाने 5-4 अशी नंतर आघाडी मिळवली होती. त्यानंतर तिने अखेरचे दोन्ही गेम जिंकत हा सेट तिच्या नावावर केला.

पण यानंतर सबलेन्काने चांगले पुनरागमन केले. या सेटमध्ये पहिल्या दोन गेमनंतर 1-1 अशी बरोबरी झाल्यावर तिने सलग तीन गेम जिंकले. त्यामुळे ती 4-1 अशा आघाडीवर होती. पण नंतर रायबाकिनाने तिची सर्व्ह राखताना 4-2 असे पुनरागमन केले. मात्र त्यानंतर दोघींनीही आपापल्या सर्व्ह राखल्याने हा सेट सबलेन्काने 6-3 असा जिंकला.

(Australian Open 2023: Aryna Sabalenka Wins first Single Grand Slam)

त्यामुळे हा सामना तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला. तिसऱ्या सेटमध्ये दोघींनीही तोडीस तोड लढत देताना 3-3 अशी बरोबरी राखली होती. पण त्यानंतर सबलेन्काने सर्व्ह ब्रेक केली आणि 4-3 अशी आघाडी घेतली. त्यानंतर तिने स्वत:ची सर्व्ह राखताना 5-3 अशी आघाडी घेतली.

मात्र त्यानंतर रायबाकिनानेही आपली सर्व्ह राखत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सबलेन्कानेही तिची सर्व्ह राखत विजेतेपदावर नाव कोरले. यादरम्यान रायबाकिनाने तीन चॅम्पियन्स पाँइंट्स वाचवले होते. मात्र सबलेन्काने बाजी मारली आणि ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदावर नाव कोरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT