Andrew Symonds  Dainik Gomantak
क्रीडा

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघातात निधन

अपघातादरम्यान सायमंड्सला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याचे निधन झाले आहे. शनिवारी रात्री टाऊन्सविले येथे झालेल्या अपघातात सायमंड्सचा मृत्यू झाला. या दु:खद बातमीने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. (Australian cricketer Andrew Symonds dies in a car accident)

मिळालेल्या माहितीनुसार, अँड्र्यू सायमंड्सच्या कारचा अपघात झाला. स्थानिक माध्यमांनुसार सायमंड्सला वाचवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. अपघातादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाने त्याच्या चाहत्यांवरही शोककळा पसरली आहे. वृत्तानुसार, क्वीन्सलँड पोलिसांकडून माहिती मिळाली आहे की ही घटना शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास हर्वे रेंजमध्ये घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. वेग जास्त असल्याने कार रस्त्यावर पलटी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी सायमंड्सला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले.

ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्टने 46 वर्षीय अँड्र्यू सायमंड्स याच्या निधनाबद्दल ट्विटद्वारे दुःख व्यक्त केले आहे. अँड्र्यू सायमंड्सपूर्वी ऑस्ट्रेलियाचे रॉड मार्श आणि शेन वॉर्न यांचा या वर्षाच्या सुरुवातीला मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT