Australia vs New Zealand 
क्रीडा

World Cup 2023: ऑस्ट्रेलियाचा 5 धावांनी रोमांचक विजय! न्यूझीलंडचा सलग दुसरा पराभव

Australia vs New Zealand: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडविरुद्ध 5 धावांनी विजय मिळवला.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023 Australia vs New Zealand:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी (28 सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना झाला. धरमशालामधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड समोर 389 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 50 षटकात 9 बाद 383 धावा करता आल्या. न्यूझीलंडचा हा सलग दुसरा पराभव आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा हा सलग चौथा विजय आहे.

न्यूझीलंडकडून 389 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डेवॉन कॉनवे आणि विल यंग यांनी शानदार सुरुवात केली होती.

त्यांनी सलामीला 61 धावांची भागीदारीही केली. मात्र, कॉनवेला आणि यंग या दोघांनाही चांगल्या सुरुवातीनंतर आपली विकेट टिकवता आली नाही. या दोघांनाही जोश हेजलवूडने बाद केले. कॉनवे 28 धावांवर आणि यंग 32 धावांवर बाद झाला. पण यानंतर रचिन रविंद्र आणि डॅरिल मिचेल यांनी न्यूझीलंडचा डाव सावरताना 96 धावांची भागीदारी केली.

मात्र त्यांची भागीदारी मिचेलला 54 धावांवर ऍडम झम्पाने बाद करत तोडली. पण त्यानंतरही रचिनला कर्णधार टॉम लॅथमने साथ दिली होती. मात्र, अर्धशतकी भागीदारीनंतर त्यांचीही जोडी तोडण्यात झम्पाला यश मिळाले. त्याने लॅथमला 21 धावांवर बाद केले.

ग्लेन फिलिप्सही 12 धावांवर बाद झाला. पण असे असले तरी रचिनने शतकी खेळी करत एक बाजू भक्कमपणे सांभाळली होती, मात्र त्यालाही पॅट कमिन्सने 41 व्या षटकात बाद करत न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. त्याने 89 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांसह 116 धावा केल्या.

यानंतर जिमी निशमने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याला मिचेल सँटेनर साथ देत होता. पण सँटेनरही 17 धावांवर झम्पाविरुद्ध खेळताना बाद झाला. तर मॅट हेन्रीलाही कमिन्सने बाद केले. अखेरच्या षटकात न्यूझीलंडला 19 धावांची गरज होती.

त्यावेळीही जिमी निशम आणि ट्रेंट बोल्टने धैर्य दाखवत चांगला खेळ केला होता. मात्र 2 चेंडूत 7 धावांची गरज असातना दुहेरी धावा घेण्याच्या प्रयत्नात निशम धावबाद झाला. निशमने 39 चेंडूत 58 धावांची खेळी केली. अखेरच्या चेंडूत ६ धावांची गरज असताना लॉकी फर्ग्युसनला एकही धाव घेता आली नाही. त्यामुळे न्यूझीलंडला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ऍडम झम्पाने 3 विकेट्स घेतल्या. तसेच जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेलने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी न्यूझीलंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजीला उतरले. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी सलामीला तब्बल 175 धावांची भागीदारी केली.

वॉर्नर या स्पर्धेतील त्याचे तिसरे शतक करण्याच्या दिशेने वाटचाल करत असतानाच त्याला ग्लेन फिलिप्सने त्याला 20 व्या षटकात बाद केले. वॉर्नरने 65 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांसह 81 धावा केल्या. असे असले तरी नंतर ट्रेविस हेडने लय कायम ठेवत शतक केले. त्याने 67 चेंडूत 109 धावांची खेळी केली. त्याने पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये खेळताना शतक करण्याचा कारनामा केला.

मात्र, त्याला 24 व्या षटकात फिलिप्सनेच बाद केले. फिलिप्सने स्टीव्ह स्मिथलाही 18 धावांवर माघारी धाडले. मिचेल मार्श आणि मार्नस लॅब्युशेन हे देखील फार काही करू शकले नाही. मात्र, ग्लेन मॅक्सवेल आणि जोश इंग्लिस यांनी आक्रमण केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सलग 325 धावांचा टप्पा गाठला. पण मॅक्सवेलचा अडथळा 45 व्या षटकात जिमी निशमने दूर केला. मॅक्सवेलने 24 चेंडूत 41 धावा केल्या.

यानंतर कर्णधार पॅट कमिन्सने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. अखेर 49 व्या षटकात पहिल्या चेंडूवर इंग्लिसला, तिसऱ्या चेंडूवर कमिन्सला आणि सहाव्या चेंडूवर ऍडम झम्पाला ट्रेंट बोल्टने बाद करत तीन विकेट्स घेतल्या.

इंग्लिसने 28 चेंडूत 38 धावा केल्या, तर कमिन्सने 14 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह 37 धावा केल्या. अखेर स्टार्कला मॅट हेन्रीने बाद करत 50 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. ऑस्ट्रेलियाने 49.2 षटकात सर्वबाद 388 धावा उभारल्या.

न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्ट आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल सँटेनरने 2 विकेट्स घेतल्या, तर मॅट हेन्री आणि जिमी निशमने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT