Alyssa Healy - Beth Mooney X/ICC
क्रीडा

INDW vs AUSW: भारताचं मालिका विजयाचं स्वप्न भंगलं! ऑस्ट्रेलियाने जिंकला तिसरा T20I सामना

India Women vs Australia Women: ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारताविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवत मालिकाही जिंकली.

Pranali Kodre

India Women vs Australia Women, 3rd T20I Match at Mumbai:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला संघात मंगळवारी (9 जानेवारी) टी20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना पार पडला. नवी मुंबई येथील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

या मालिकेतील पहिला सामना भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. 

तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियासमोर 148 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 18.4 षटकात 3 विकेट्स गमावत १४९ धावा करत सहज पूर्ण केला. एलिसा हेली आणि बेथ मुनी यांनी अर्धशतके केली.

तिसऱ्या सामन्यात भारताने दिलेल्या 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून एलिसा हेली आणि बेथ मुनी फलंदाजीला उतरल्या होत्या. हेलीने आक्रमक सुरुवात केली होती तिला मुनी चांगली साथ देत होती.

पण 7 व्या षटकात हेली 38 धावांवर असताना जेमिमाह रोड्रिग्सने तिचा जमिनीलगत झेल घेतला आहे की नाही, हे पुरेशा पुराव्यांअभावी स्पष्ट न झाल्याने तिला जीवदान मिळाली. या जीवदानाचा फायदा घेत तिने अर्धशतक केले. पण अर्धशतकानंतर तिला 10 व्या षटकात दीप्ती शर्माने पायचीत केले. हेलीने 38 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 55 धावांची खेळी केली. तिने मुनीसह 85 धावांची भागीदारीही केली.

ती बाद झाल्यानंतर मुनीने ताहलिया मॅकग्रासह डाव पुढे नेला मात्र 16 व्या षटकात पुजा वस्त्राकरने ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. तिने मॅकग्राला 20 धावांवर बाद केल्यावर पुढच्याच चेंडूवर एलिस पेरीलाही शुन्यावर पायचीत केले.

त्यामुळे ऑस्ट्रेलिया दबावात होते, मात्र मुनीने फोबी लिचफिल्डला साथीला घेत डाव पुढे नेला आणि ऑस्ट्रेलियाचा विजय पक्का केला. मुनी 45 चेंडूत 52 धावांवर नाबाद राहिली. तसेच फोबी लिचफिल्ड 13 चेंडूत 17 धावांवर नाबाद राहिली.

भारताकडून गोलंदाजीत पुजा वस्त्राकरने 2 विकेट्स घेतल्या, तर दिप्ती शर्माने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताकडून शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी सलामीला फलंदाजी केली. शफालीने सुरुवातीला आक्रमक खेळ केला. मात्र ती 17 चेंडूत 6 चौकारांसह 26 धावांवर बाद झाली. तिच्यानंतर स्मृती एकाबाजूने चांगला खेळ करत असतानाच जेमिमाह रोड्रिग्स 2 धावांवर बाद झाली.

पाठोपाठ स्मृती मानधनाही 29 धावांवर बाद झाली, त्यापाठोपाठ कर्णधार हरमनप्रीत कौर 3 धावांवर माघारी परतली. त्यामुळे भारताची अवस्था 4 बाद 66 धावा अशी होती. नंतर ऋचा घोश आणि दिप्ती शर्मा यांनी डाव सावरला. पण 15 व्या षटकात दिप्तीही 14 धावांवर बाद झाली.

नंतर अमनजोत आणि ऋचाने छोटी भागीदारी करत भारताला 130 धावांचा टप्पा पार करून दिला. पण ऋचा अखेरच्या षटकात बाद झाली. तिने 34 धावा केल्या. अखेरीस पुजा वस्त्राकरने षटकार ठोकत भारताला 20 षटकात 6 बाद 147 धावांपर्यंत पोहचवले. अमनजोत कौर १७ धावांवर नाबाद राहिली, तर पुजा वस्त्राकरत 7 धावांवर नाबाद राहिली.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत ऍनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेअरहॅम यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मेगन शट आणि ऍश्ले गार्डनर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT