Australia Cricket Team
Australia Cricket Team X/CricketAus
क्रीडा

AUS vs PAK: ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तान चारीमुंड्या चीत! तिसरी कसोटी जिंकत दिला व्हाइटवॉश

Pranali Kodre

Australia vs Pakistan, 3rd Test at Sydney:

शनिवारी (6 जानेवारी) ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने पाकिस्तानला कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात 8 विकेट्सने पराभूत केले. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने ही मालिकाही 3-0 अशा फरकाने जिंकली.

सिडनीला झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर 130 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात 25.5 षटकात 2 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. यासह हा सामनाही जिंकत पाकिस्तानला व्हाइटवॉश दिला.

ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅब्युशेन यांनी अर्धशतके केली. उस्मान ख्वाजा पहिल्याच डावात शुन्यावर बाद झाल्यानंतर वॉर्नर आणि लॅब्युशेन यांनी ११९ धावांची भागीदारी केली.

ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅब्युशेन यांनी अर्धशतके केली. उस्मान ख्वाजा पहिल्याच डावात शुन्यावर बाद झाल्यानंतर वॉर्नर आणि लॅब्युशेन यांनी ११९ धावांची भागीदारी केली.

मात्र, विजयासाठी अवघ्या 11 धावांची गरज असताना वॉर्नर कसोटी कारकिर्दीत अखेरच्या वेळी बाद झाला. त्याने 57 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर लॅब्युशेन आणि स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

लॅब्युशेन 62 धावांवर नाबाद राहिला, तर स्मिथ 4 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात दोन्ही विकेट्स साजिद खानने घेतल्या.

तत्पुर्वी, या सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानचा दुसरा डाव 43.1 षटकात 115 धावांवर संपला होता. पण पहिल्या डावातील 14 धावांच्या आघाडीमुळे त्यांनी ऑस्ट्रेलियासमोर 130 धावांचे आव्हान ठेवले.

दुसऱ्या डावात साईम आयुबने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. बाकी कोणालाही 30 धावांचा टप्पा पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून या डावात जोश हेजलवूडने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

पहिल्या डावात पाकिस्तानला आघाडी

या सामन्यात पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. पाकिस्तानने पहिल्या डावात 77.1 षटकात 313 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 88 धावांची खेळी केली, तर अमीर जामलने 82 धावा केल्या. तसेच आघा सलमाननेही 53 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून या डावात कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 109.4 षटकात 299 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे पाकिस्तानला 14 धावांची आघाडी मिळाली.

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली, तर मिचेल मार्शनेही 54 धावा केल्या. याशिवाय अन्य फलंदाजांनी छोटेखानी खेळी केल्या. या डावात पाकिस्तानकडून अमीर जामेलने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT