Australia Cricket Team AFP
क्रीडा

ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला दुहेरी धक्का! कसोटी क्रमवारीतच नाही, WTC पाँइंट्स-टेबलमध्येही 'अव्वल'

WTC Points-table: ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाँइंट्सटेबलमध्ये भारताला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला आहे.

Pranali Kodre

Australia surpassed India to top ICC World Test Championship 2023-25 standings:

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात नुकतीच तीन सामन्यांची कसोटी मालिका संपली. शनिवारी (6 जानेवारी) ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला सिडनी येथे झालेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 8 विकेट्सने पराभूत केले. यासह ही मालिका 3-0 अशी जिंकली.

या विजयासह ऑस्ट्रेलियाने आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेच्या गुणतालिकेतही अव्वल क्रमांक मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने गुणतालिकेत भारताला मागे टाकले आहे.

खरंतर गुरुवारी (4 जानेवारी) भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला होता आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला होता. मात्र, दोनच दिवसात ऑस्ट्रेलियाने भारताकडून हा अव्वल क्रमांका हिरावला.

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत विजय मिळवल्याने आता त्यांची टेस्ट चॅम्पियनशीपची विजयी टक्केवारी 56.25 आहे. तसेच भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत राखल्यानंतर 54.16 टक्केवारी आहे. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.

याच मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेची टक्केवारी 50 असल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तानचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही सामने पराभूत झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. ते सहाव्या क्रमांकावर घसरले आहेत, त्यांची 36.66 टक्केवारी आहे.

चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडची आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशचीही टक्केवारी दक्षिण आफ्रिकेप्रमाणे 50 आहे.

आता भारताला पुन्हा अव्वल क्रमांक मिळवण्याची संधी आगामी इंग्लंडविरुद्ध 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मालिकेत असेल. भारताला मायदेशात इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

कसोटी क्रमवारीतही ऑस्ट्रेलिया अव्वल

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत बरोबरी साधल्यानंतर ऑस्ट्रेलियाने कसोटी संघ क्रमवारीतही अव्वल क्रमांक मिळवला. कसोटी क्रमवारीतही ऑस्ट्रेलियाने भारताला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला.

सध्या ऑस्ट्रेलिया 118 गुणांसह कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे, तर भारतीय संघ 117 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT