India vs Australia | World Cup 2023 Final
India vs Australia | World Cup 2023 Final ICC
क्रीडा

भारताला पराभूत करत World Cup जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने असं केलं ड्रेसिंग रुममध्ये सेलिब्रेशन, पाहा Video

Pranali Kodre

Australia Celebration in Dressing Room after winning 6th Cricket World Cup title by defeating India in the Final:

ऑस्ट्रेलियाने रविवारी (19 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभूत केले. यासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप विजयाला गवसणी घातली.

ऑस्ट्रेलियाने हा विश्वविजय मिळवल्यानंतर मोठा जल्लोष केला. ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी विजयी धाव घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू मैदानात धावत आले होते. त्यावेळी त्यांनी मैदानात कल्ला केला.

त्यानंतर त्यांचा वर्ल्डकप ट्रॉफी देऊन सन्मान केल्यानंतर ती ट्रॉफी घेऊन कर्णधार पॅट कमिन्स ड्रेसिंग रुममध्ये पोहला.

यावेळी ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंनी वर्ल्डकप ट्रॉफीबरोबर फोटो काढले, तसेच ती ट्रॉफी घेऊन ग्लेन मॅक्सवेल डान्सही करताना दिसला. तसेच खेळाडू एकमेकांचे फोटोही काढताना दिसले. या ऑस्ट्रेलियाच्या जल्लोषाचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलियाचा सहावा विश्वविजय

ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाने सहाव्यांदा वनडे वर्ल्डकपवर नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाने 1975, 1987, 1996, 1999, 2003, 2007, 2015 आणि 2023 साली वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला आहे. यातील 1987, 1999, 2003, 2007, 2015 आणि 2023 साली ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला आहे.

वर्ल्डकप जिंकणारे ऑस्ट्रेलियन कर्णधार

पॅट कमिन्स हा वनडे वर्ल्डकप जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा पाचवा कर्णधार ठरला. यापूर्वी ऍलन बॉर्डर (1987), स्टीव्ह वॉ (1999), रिकी पाँटिंग (2003 आणि 2007) आणि मायकल क्लार्क (2015) यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला आहे.

भारताचं स्वप्न भंगलं

रविवारी अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या होत्या. भारताकडून केएल राहुल (66) आणि विराट कोहली (54) यांनी अर्धशतके केली, तसेच रोहितने 47 धावांची खेळी केली. मिचेल स्टार्कने ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 47 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्युशेन यांच्या जोडीने चौथ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवले.

हेडने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांसह 137 धावांची खेळी केली. लॅब्युशेन 110 चेंडूत 4 चौकारांसह 58 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT