AUS vs PAK, U19 World Cup Dainik Gomantak
क्रीडा

AUS vs PAK, U19 World Cup: वर्ल्ड कप फायनलमध्ये इंडिया-ऑस्ट्रेलिया भिडणार; चांगले खेळूनही पाकिस्तानच्या पदरी निराशा!

Manish Jadhav

AUS vs PAK, U19 World Cup: पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर-19 विश्वचषक 2024 मधील दुसरा उपांत्य सामना आज म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी विलोमूर पार्क, बेनोनी येथे खेळला गेला. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना चालल्यामुळे रोमांचक ठरला. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजयासाठी 3 धावांची गरज होती आणि पाकिस्तानला एका विकेटची गरज होती, पण ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज राल्फ मॅकमिलनने चौकार मारुन ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीचे तिकीट मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाने एका विकेटने विजय मिळवला असून आता कांगारु संघाला अंतिम फेरीत भारताचा सामना करावा लागणार आहे. रविवारी 11 फेब्रुवारीला हा सामना खेळवला जाणार आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा जेतेपदाच्या लढतीत पोहोचला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाला तीन वेळा विजेतेपद पटकावण्यात यश आले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्यांदा अंतिम सामना होणार आहे. यापूर्वी भारताने 2012 आणि 2018 मध्ये पराभव केला होता. भारताने एकूण पाचवेळा जेतेपदाचा किताब मिळवला आहे.

पाकिस्तान संघाने 180 धावांचे छोटे लक्ष्य दिले

दरम्यान, दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि संपूर्ण संघ 179 धावांतच गारद झाला. पाकिस्तानच्या फलंदाजांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. त्यांनी अवघ्या 79 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. यानंतर अझान अवेस (52) आणि अराफत मिन्हास (52) यांनी अर्धशतके झळकावून पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. पहिल्यांदा खेळताना पाकिस्तानने 48.5 षटकांत सर्वबाद 179 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून टॉम स्ट्रेकरने 9.5 षटकांत 24 धावांत सर्वाधिक 6 बळी घेतले.

शेवटची विकेट आणि कांगारु संघाने 16 धावा केल्या

दुसरीकडे, 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने 164 धावांवर 9 विकेट गमावल्या होत्या. संघाला विजयासाठी 24 चेंडूत 16 धावांची गरज होती. राफ मॅकमिलनने नाबाद 19 धावा करत संपूर्ण गेमच ऑस्ट्रेलियाच्या बाजूने फिरवला. विशेष म्हणजे, मॅकमिलनला कॅलम विडलरची साथ मिळाली. कॅलम 9 चेंडूत 2 धावा करुन नाबाद राहिला. पाकिस्तानी गोलंदाज शेवटच्या षटकापर्यंत मॅचविनिंग विकेट घेण्यासाठी तळमळत राहिले, पण कांगारुंनी बाजी मारली.

अली रझाने 4 तर अराफतने 2 बळी घेतले

अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियन संघाने 9 गडी गमावून 181 धावा करत सामना जिंकला. अशा प्रकारे कांगारु संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाकडून हॅरी डिक्सनने सर्वाधिक 50 आणि ऑलिव्हर पीकने 49 धावांची खेळी खेळली. तर पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज अली रझाने सर्वाधिक 4 बळी घेतले. फिरकीपटू अराफत मिन्हासने 2 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT