David Warner  Twitter/ @mufaddal_vohra
क्रीडा

AUS vs SA: डेव्हिड वॉर्नरचा मोठा पराक्रम, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्माच्या रेकॉर्डशी केली बरोबरी!

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 पूर्वी डेव्हिड वॉर्नरबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 पूर्वी डेव्हिड वॉर्नरबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण या दिग्गज खेळाडूने चालू स्पर्धेत 500 धावांचा टप्पा ओलांडून सर्वाना दाखवून दिले की तो मोठ्या मंचावरचा खेळाडू आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचे छोटे लक्ष्य असताना त्याने 18 चेंडूत 29 धावांची शानदार खेळी केली. यासह त्याने 10 सामन्यात 528 धावा पूर्ण केल्या आहेत. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 49 चौकार आणि 24 षटकार मारले आहेत.

वॉर्नरने सचिन आणि रोहितच्या विक्रमांची बरोबरी केली

दरम्यान, डेव्हिड वॉर्नरने (David Warner) 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत 500 धावांचा टप्पा पार करुन मोठी कामगिरी केली आहे. त्याने एका खास विक्रमात सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांची बरोबरी केली आहे.

हा एक विशेष विक्रम आहे, दोन विश्वचषक एडिशनमध्ये 500 हून अधिक धावा करण्याचा विक्रम. सचिन आणि रोहितनंतर वॉर्नर अशी कामगिरी करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. वॉर्नरने सलग दुसऱ्या विश्वचषकात ही कामगिरी केली आहे. रोहितनेही सलग दोनदा अशी कामगिरी केली आहे.

एकदिवसीय विश्वचषकाच्या दोन एडिशनमध्ये 500 हून अधिक धावा

सचिन तेंडुलकर (1996, 2003)

रोहित शर्मा (2019, 2023)

डेव्हिड वॉर्नर (2019, 2023)

डेव्हिड वॉर्नरची विश्वचषकातील कामगिरी

डेव्हिड वॉर्नरचा हा तिसरा एकदिवसीय विश्वचषक आहे. त्याने आतापर्यंत एकूण 28 सामने खेळले असून त्याच्या नावावर एकूण 1520 धावा आहेत. वॉर्नरने या स्पर्धेत एकूण 6 शतके आणि पाच अर्धशतके केली आहेत. या स्पर्धेतील त्याची सरासरी 58.4 इतकी आहे. त्याने या स्पर्धेत 101.19 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) विश्वचषकात सर्वाधिक शतके करणारा तो दुसरा खेळाडू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NSUI Law Students: 'कायदा'च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या! 'एनएसयूआय'ची मागणी; कुलगुरूंकडून तोडगा काढण्याचे आश्‍वासन

Goa Tourist Safety: अभयारण्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल, दंडासह अटकेचीही शक्यता

California Shooting: कॅलिफोर्नियात फिफा वर्ल्ड कप फॅन झोनजवळ गोळीबार! एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Akshat Naik Death Case: 'अक्षत' मृत्यूप्रकरणी नव्याने तपास करा, वडिलांची पोलिसांत तक्रार, पुरावे लपविल्याचा आरोप

Monsoon Tourism: सोशल मीडियासाठी रिल्स, सेल्फीचा नाद घेतो जीव! पावसाळी पर्यटनाचा मुद्दा बनला जटिल; धारबांदोड्यात 17 धोकादायक स्थळे

SCROLL FOR NEXT