Sachin Tendulkar
Sachin Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

AUS vs SA: सामना चालू असतानाच अशी घडना घडली..., ज्याने थेट क्रिकेटच्या देवाचीच आठवण झाली

दैनिक गोमन्तक

Australia vs South Africa 3rd Test, Usman Khawaja: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान अशी घटना घडली, ज्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरची आठवण झाली. ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व करत असलेल्या पॅट कमिन्सने (Pat Cummins) आपल्याच सहकाऱ्याला द्विशतक पूर्ण करु दिले नाही. दुहेरी शतक पूर्ण करण्यापासून तो अवघ्या 5 धावा दूर होता, पण कमिन्सने डाव घोषित केला. यावरुन मला 18 वर्ष जुनी गोष्ट आठवली.

ख्वाजा 195 धावांवर खेळत असताना डाव घोषित करण्यात आला

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने शानदार फलंदाजी केली. तो द्विशतक करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण कर्णधार पॅट कमिन्सने डाव घोषित करण्याची घोषणा केली. ख्वाजा 195 धावा करुन नाबाद परतला. यादरम्यान त्याने 368 चेंडूंचा सामना करत 19 चौकार, 1 षटकार लगावला. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथनेही शतक झळकावले. स्मिथने 192 चेंडूंच्या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 4 गड्यांच्या मोबदल्यात 475 धावा करुन घोषित केला.

2004 ची गोष्ट आठवण झाली

उस्मान ख्वाजाच्या या घटनेने चाहत्यांना 2004 सालची आठवण करुन दिली. असाच एक प्रसंग महान फलंदाज सचिन तेंडुलकरसोबत (Sachin Tendulkar) घडला होता. मार्च 2004 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात मुलतान येथे कसोटी सामना खेळला गेला. सचिन तेंडुलकर 194 धावा करुन नाबाद होता, त्यानंतर संघाचा तत्कालीन कर्णधार राहुल द्रविडने डाव घोषित करण्याची घोषणा केली. त्यावेळी सचिनचे द्विशतक अवघ्या सहा धावांनी हुकले होते. सिडनीच्या मैदानावर डाव घोषित करुन ख्वाजा पॅव्हेलियनमध्ये परतत असताना चाहत्यांना तोच प्रसंग आठवला.

पावसाने व्यत्यय आणला

पावसाचा सिडनी कसोटीवर चांगलाच परिणाम झाला आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी पाऊस आणि खराब प्रकाशामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला. तिसऱ्या दिवशी सामना होऊ शकला नाही. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात 4 बाद 475 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 6 गडी गमावून 149 धावा केल्या आहेत. कर्णधार कमिन्सने दमदार गोलंदाजी करत 3 बळी घेतले तर जोश हेझलवूडने 2 बळी घेतले. सध्या पाहुणा संघ ऑस्ट्रेलियाच्या 326 धावांनी मागे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Tim Cook: ‘’ॲपलच्या भारतातील कामगिरीवर खूप खूश, प्रतिस्पर्धी म्हणून राहण्यासाठी...’’

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT