ATK Mohan Bagan Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: एटीके मोहन बागानने नॉर्थईस्ट युनायटेडचा उडवला धुव्वा

विजयासह एटीके मोहन बागान दुसरे पिछाडीवरून नॉर्थईस्ट युनायटेडला 3-1 फरकाने हरविले.

दैनिक गोमन्तक

पणजी: नॉर्थईस्ट युनायटेडने आघाडी घेतली आणि लगेच गमावली. त्याचा लाभ उठवत एटीके मोहन बागानने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत 3-1 असा फरकाने विजय नोंदविला आणि आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या स्थानी उडी घेतली. सामना शनिवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. सामना शनिवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. (ATK Mohan Bagan)

नॉर्थईस्ट युनायटेडसाठी व्ही. सुहेर याने 17व्या मिनिटास गोल केला. 22व्या मिनिटास एटीके मोहन बागानसाठी फिनलंडचा जॉनी कौको याने बरोबरीचा गोल नोंदविला. नंतर शानदार फॉर्ममध्ये असलेल्या लिस्टन कुलासोने मोसमातील वैयक्तिक सातवा गोल नोंदवत 45व्या मिनिटास एटीके मोहन बागानला 2-1 असे वर्चस्व मिळवून दिले. यंदा आयएसएलमध्ये भारतीयांतर्फे गोमंतकीय आघाडीपटूने सर्वाधिक गोल केले आहेत. नंतर 52व्या मिनिटास मानवीर सिंगने आघाडी आणखीनच बळकट केली. लिस्टनने आज सुरेख खेळ करून वाहव्वा मिळविली. त्याने एक गोल केला, तसेच अन्य दोन्ही गोल त्याच्या असिस्टवर झाले.

सलग 10 सामने अपराजित असलेल्या एटीके मोहन बागानने (Atk Mohan Bagan)14 लढतीत सातवा विजय नोंदविला. त्यांचे आता 26 गुण झाले असून पहिल्या क्रमांकावरील हैदराबाद एफसीपेक्षा तीन गुण कमी आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीपेक्षा एक गुण जास्त आहेत. सलग दहा सामन्यांत एटीके मोहन बागानने पाच विजय व पाच बरोबरीची नोंद केलीय. नॉर्थईस्ट युनायटेडची खराब कामगिरी कायम राहिली. 17 लढतीत त्यांना तब्बल अकरावा पराभव पत्करावा लागला. सर्वाधिक 38 गोल स्वीकारलेल्या या संघाचे 10 गुण आणि शेवटचा अकरावा क्रमांक कायम राहिला.

पिछाडीवरून मुसंडी

नॉर्थईस्टने आघाडीनंतर पुन्हा एकदा पिछाडीवर जाण्याची परंपरा कायम राखली. मार्सेलो परेरा व व्ही. सुहेर यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे नॉर्थईस्टला आघाडी मिळाली. सुहेरने एटीके मोहन बागानच्या बचावफळीत चकवा दिल्यानंतर सणसणीत प्रेक्षणीय फटक्यावर गोलरक्षक अमरिंदर सिंगचा बचाव भेदला. गुवाहाटीच्या संघाचा आनंद जास्त काळ टिकला नाही. पाच मिनिटानंतर फिनलंडचा विश्वकरंडक खेळाडू जॉनी कौको याच्या गोलमुळे एटीके मोहन बागानला बरोबरी साधता आली. गोलक्षेत्रात लिस्टनकडून मिळालेल्या शानदार पासवर कौको याने प्रतिस्पर्धी गोलरक्षक सुभाशिष रॉय याला अजिबात संधी दिली नाही. त्याचा हा आयएसएल स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला.

विश्रांतीपूर्वी लिस्टनने मोसमातील वैयक्तिक सातवा गोल नोंदवत एटीके मोहन बागानला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलवेळी कौको याने मध्यक्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. त्याने मुसंडी मारलेल्या लिस्टनकडे चेंडू पास केला. गोमंतकीय आघाडीपटूवर सणसणीत फटक्यावर चेंडूला अचूक दिशा दाखविली. विश्रांतीनंतर सातव्या मिनिटास मानवीर सिंगने सलग दुसरा, तर एकंदरीत मोसमातील तिसरा गोल नोंदवत एटीके मोहन बागानची आघाडी 3-1 अशी भक्कम केली. यावेळेस लिस्टनकडून मिळालेल्या पासवर मानवीरने नॉर्थईस्टच्या बचावपटूस मागे टाकत चमकदार गोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT