FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवाविरुद्ध एटीके मोहन बागानचे पारडे जड

ओर्तिझवर एफसी गोवाची मदार

दैनिक गोमन्तक

पणजी ः एटीके मोहन बागान संघ आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football)स्पर्धेत सलग दहा सामने अपराजित आहे. त्यांची मालिका भेदण्याचे खडतर आव्हान एफसी गोवास पेलावे लागेल. एकंदरीत कोलकात्यातील संघाचे पारडे जड संभवते.

एफसी गोवा आणि एटीके मोहन बागान यांच्यातील सामना मंगळवारी (ता. 15) बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर खेळला जाईल. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात एटीके मोहन बागानने विजय नोंदविला होता आणि हा संघ गोव्यातील संघाविरुद्ध अजूनपर्यंत एकही सामन्यांत पराभूत झालेला नाही. सध्या एकंदरीत आकडेवारी आणि फॉर्म एटीके मोहन बागानच्या बाजूने आहे, मात्र मागील लढतीत चेन्नईयीन एफसीचा पाच गोलने धुव्वा उडविलेल्या एफसी गोवाचा (FC Goa) आत्मविश्वास उंचावलेला आहे. 

हुआन फेरांडो हे एफसी गोवाचे माजी प्रशिक्षक, आता ते एटीके मोहन बागानसाठी सफल ठरले आहेत. उद्या त्यांनी आणखी एक विजय नोंदविल्यास अग्रस्थानावरील हैदराबाद एफसीला गाठणे शक्य होईल. एटीके मोहन बागानने सध्या 14सामन्यांतून 26 गुण नोंदवले आहेत. एफसी गोवाचे 16 लढतीतून 18 गुण असून ते सध्या नवव्या क्रमांकावर आहेत. बाकी चारही सामने जिंकल्यास त्यांना प्ले-ऑफ फेरीत जागा मिळू शकेल. एटीके मोहन बागान आणि एफसी गोवा यांच्यासाठी बचावफळीत समस्या आहेत. त्यांनी फक्त दोन लढतीतच क्लीन शीट राखली आहे. एफसी गोवाने 24, तर एटीके मोहन बागानने 22 गोल स्वीकारले आहेत.

लिस्टन कुलासो फॉर्ममध्ये

एटीके मोहन बागानचा गोमंतकीय आघाडीपटू यंदा एटीके मोहन बागानतर्फे खेळताना सफल ठरला आहे. सलग दोन लढतीत गोल नोंदवून त्यांनी 14 सामन्यांतील एकूण गोलसंख्या 7 वर नेली. एफसी गोवाच्या (goa) बचावफळीसमोर 23 वर्षीय लिस्टनचाच जास्त धोका असेल.

ओर्तिझवर एफसी गोवाची मदार

चेन्नईयीन एफसीविरुद्धच्या दणकेबाज विजयात एफसी गोवाच्या होर्गे ओर्तिझ याने हॅटट्रिक नोंदविली. त्याच्यावरच डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची मदार असेल. या 29 वर्षीय आघाडीपटूने आतापर्यंत 12 सामन्यांत 7 गोल केले आहेत.

‘‘प्रत्येक लढत अंतिम सामन्याप्रमाणे आहे. आज तुम्ही मला विचारलं तर मी म्हणेन एफसी गोवाविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. याच आठवड्यात नंतर केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या लढतीवेळी मी याच वक्तव्याचा पुनरुच्चार करेन, बाकी सर्व सहाही सामन्यांबाबत माझे हेच म्हणणे असेल.’’ अस मत हुआन फेरांडो यांनी व्यक्त केले आहे.

मैदानात उतरण्यापूर्वी...

- एफसी गोवा व एटीके मोहन बागान यांच्यात 3 सामने

- 2 लढतीत एटीके मोहन बागान विजयी, 1 सामना बरोबरीत

- पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे एटीके मोहन बागान 2-1 फरकाने विजयी

- आयएसएलमधील मागील 10 लढतीत एटीके मोहन बागानचे 5 विजय, 5 बरोबरी

- एटीके मोहन बागानचे स्पर्धेत 7 विजय, 5 बरोबरी, 2 पराभव, गोलफरक +7

- एफसी गोवाचे 4 विजय, 6 बरोबरी, 6 पराभव, गोलफरक -1

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bench: चिंबलमधील बेकायदेशीर 43 बोअरवेल्स मालकांना मोठा दणका! गोवा खंडपीठाचे भूजल अधिकाऱ्यांना कठोर दंडात्मक कारवाईचे आदेश

Goa Agriculture: कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना; गरज भासल्यास नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी ग्वाही

Goa Education: उज्ज्वल भविष्यासमोर गळतीचे मोठे आव्हान! 28 % विद्यार्थी पोहोचत नाहीत बारावीपर्यंत; राज्यातील स्थिती, 'युडीआयएसई प्लस' अहवालातून समोर

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

SCROLL FOR NEXT