Govind Gawde Dainik Gomantak
क्रीडा

गोव्यात क्रीडापटूंना सरकारी नोकरीत आरक्षण अपेक्षित; क्रीडामंत्री गोविंद गावडे

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी दोन टक्के आरक्षित जागांची मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी: देशातील इतर राज्यांत क्रीडापटूंना सरकारी नोकरीत आरक्षण आहे. त्याच धर्तीतर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरणाऱ्या खेळाडूंना गोवा सरकारने नोकर भरतीत दोन टक्के जागा आरक्षित कराव्यात अशी मागणी आपण करणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सोमवारी दिली. (Athletes in Goa expected to get reservations in government jobs; Sports Minister Govind Gawde )

क्रीडामंत्री गावडे यांनी सांगितले, की ‘‘मणिपूरसारख्या राज्यात क्रीडापटूंसाठी सरकारी नोकरीत दहा टक्के आरक्षण आहे. इतर ठिकाणी ते तीन ते दोन टक्के आहे. गोवा राज्यात दोन टक्के आरक्षण असावे ही माझी मागणी आहे. त्याचा लाभ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत चमकलेल्या गोमंतकीय खेळाडूंना होईल.’’

राष्ट्रीय स्पर्धेसाठी पाच महिने हवेत

गोव्यात नियोजित असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पूर्ण तयारीसाठी आणखी पाच ते सहा महिन्यांचा कालावधीत आवश्यक असल्याचे क्रीडामंत्री गावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, की ‘‘भारतीय ऑलिंपिक संघटनेने सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्याबाबत विचारणा करणारे पत्र पाठविले आहे. सध्या पाऊस सुरू आहे, त्यामुळे पूर्ण सज्जतेसाठी आणखी वेळ आवश्यक आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत तयारी होईल. आणखी पाच ते सहा महिने आवश्यक आहे.

सध्या तयार असलेल्या साधन सुविधांवर पुन्हा हात फिरवावा लागेल. मागील तीन-चार महिन्यांत कामाने वेग घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर १७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सामने होणार आहे. या स्पर्धेची सर्व तयारी १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे साधनसुविधा तयारीचे एकंदरीत वेळापत्रक भरगच्च आहे.’’

क्रीडा विकासासाठी कटिबद्ध

गोव्यातील क्रीडा क्षेत्राचा विकास आणि प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचेही क्रीडामंत्री गावडे यांनी नमूद केले. त्याअनुषंगाने गोव्यात काय करणे आवश्यक आहे यावर भर दिला जातोय. हल्लीच ते गुजरातमधील केवाडिया येथे विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील क्रीडामंत्र्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेत सहभागी झाले होते. खेलो इंडिया योजनेअंतर्गत गोव्यातील तीन क्रीडा प्रशिक्षण केंद्रे लवकरच सुरू होतील आणि कांपाल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाचे उद्‍घाटन व लोकार्पण १० जुलै रोजी नियोजित असल्याची माहितीही मंत्री गावडे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT