India Kabaddi team Dainik Gomantak
क्रीडा

Asian Kabaddi Championship: भारताचे विक्रमी विजेतेपद! रोमांचक फायनलमध्ये इराणला दिली मात

India Kabaddi Team: भारतीय पुरुष कबड्डी संघाने एशियन चॅम्पियनशीपचे विक्रमी विजेतेपद जिंकले.

Pranali Kodre

India win Asian Kabaddi Championship 2023: भारतीय पुरुष कबड्डी संघाने शुक्रवारी एशियन चॅम्पियनशीपचे विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला आहे. दक्षिण कोरियामधील बुसान येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने इराणला 42-32 अशा फरकाने पराभूत केले. भारताचे हे या स्पर्धेचे आठवे विजेतेपद आहे.

या सामन्यात इराणने भारताला तगडी लढत दिली होती. पण पवन सेहरावतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने संपूर्ण सामन्यात चांगला खेळ करत विजेतेपदाला गवसणी घातली. या सामन्यात इराणचा संघ तीन वेळा ऑलआऊट झाला होता. भारताने या सामन्यात पहिल्या हाफनंतर 23-11 अशी चांगली आघाडी मिळवली होती.

पण, त्यानंतर इराणने चांगला खेळ करत पुनरागमन केले. अखेरची दीड मिनिटे चांगलीच रोमांचक ठरली. 39-32 अशा स्थितीत सामना असताना भारताचा अस्लम इनामदार हा एकमेव खेळाडू मॅटवर होता. त्याची रेडही 'डू ऑर डाय' होती. त्यामुळे त्याला पाँइंट मिळवणे गरजेचे होते. त्याने बोनस गुण मिळवला.

त्यानंतर इराणकडून मोहम्मद्रेझा रेडला आल्यावर त्याला अस्लमने हुलकावणी देणे सुरु केले. ही रेडही डू ऑर डाय होती. मात्र मोहम्मद्रेझाचा असा गैरसमज झाला की अस्लमचा पाय बाह्यरेषेला लागला आहे. त्यामुळे तो परत गेला. मात्र अस्लमचा पाय बाह्यरेषेला लागलेला नव्हता. त्यामुळे भारताला दोन गुण मिळाले. त्याचा अखेरीस फायदा झाला.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या स्पर्धेत यंदा इराणने नवोदित खेळाडू उतरवले होते. फझल अत्राचलीसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. या स्पर्धेकडे सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या एशियन गेम्सच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने पाहिले जात आहे.

भारताचे आठवे विजेतेपद

साल 1980 मध्ये सुरुवात झालेल्या एशियन कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताने 1980, 1988, 2000, 2001, 2002 असे सलग पाच विजेतीपदे जिंकली होती. त्यानंतर 2003 मध्ये इराणने विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर 2005, 2017 आणि 2023 मध्ये भारताने विजेतेपद जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT