Kartik Kumar And Gulveer  Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2023: 10 हजार मीटर शर्यतीत भारताला दोन पदके, कार्तिक आणि गुलवीरने रचला इतिहास

Asian Games 2023: या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अॅथलेटिक्समधील म्हणजे ट्रॅक आणि फील्डमधील भारताचे हे तिसरे पदक आहे.

Manish Jadhav

Asian Games 2023: चीनमधील हँगझोऊ शहरात सुरु असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी अॅथलेटिक्समधील पुरुषांच्या 10 हजार मीटर शर्यतीत भारताने रौप्य आणि कांस्य अशी दोन्ही पदके पटकावली.

भारताकडून या स्पर्धेत सहभागी झालेल्या कार्तिक कुमारने 28:15:38 या वेळेसह रौप्यपदक जिंकले, तर गुलवीरने 28:17:21 या वेळेसह कांस्यपदक जिंकले.

या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अॅथलेटिक्समधील म्हणजे ट्रॅक आणि फील्डमधील भारताचे हे तिसरे पदक आहे. याआधी सहाव्या दिवशी किरण बालियानने महिलांच्या शॉट पुट प्रकारात कांस्यपदक पटकावले होते.

दरम्यान, या स्पर्धेत भारताने (India) आतापर्यंत एकूण 10 सुवर्णपदके जिंकली आहेत. याशिवाय 14 रौप्य आणि 14 कांस्यपदकेही जिंकली असून, त्यानंतर एकूण पदकांची संख्या आता 38 वर पोहोचली आहे.

सध्या, भारताला ऍथलेटिक्समध्ये आणखी पदके मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये भालाफेक स्पर्धेत सर्वांच्या नजरा नीरज चोप्रावर असतील.

दुसरीकडे, स्पर्धेच्या सातव्या दिवशी महिलांच्या टेबल टेनिस दुहेरी स्पर्धेतही भारताची कामगिरी दिसून आली.

भारताच्या सुतीर्थ आणि अहिका मुखर्जी या जोडीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चिनी जोडीचा पराभव करुन उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. यासह या स्पर्धेतील भारताचे पदकही निश्चित झाले आहे.

स्क्वॉशमध्ये पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकले

सौरव घोषालच्या नेतृत्वाखाली भारताच्या पुरुष स्क्वॉश संघाने सुवर्णपदकाच्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) 2-1 अशा रोमहर्षक पद्धतीने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. याआधी, सकाळी भारताने मिश्र दुहेरी टेनिसमध्ये सुवर्णपदक मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT