Indian Women's Football Teams Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2023: भारतीय महिला फुटबॉल संघाची खराब सुरुवात, चायनीज तैपेईकडून पराभवाचा धक्का!

Asian Games 2023: हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाला चायनीज तैपेईकडून 2-1 ने पराभव स्वीकारावा लागला.

Manish Jadhav

Asian Games 2023: हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाला चायनीज तैपेईकडून 2-1 ने पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली.

भारताने दुसऱ्या हाफमध्ये एका गोलच्या जोरावर चायनीज तैपेईवर 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र, सामन्याच्या शेवटच्या क्षणी दोन गोल गमावल्याने टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला अंजू तमांगने भारताला आघाडी मिळवून दिली होती, मात्र चायनीज तैपेईने 69व्या आणि 87व्या मिनिटाला गोल नोंदवत विजयाची नोंद केली. चायनीज तैपेईकडून लाइ ली चिन आणि हसू यू सुआन यांनी गोल केले.

दरम्यान, 17 संघांच्या महिलांच्या स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत पाच गट तयार करण्यात आले आहेत. 4-4 संघ दोन गटात ठेवण्यात आले आहेत. तर तीन गटात 3-3 संघांना स्थान देण्यात आले आहे.

भारतीय संघ चायनीज तैपेई आणि थायलंडसह ब गटात आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया (Team India) आता (रविवारी) 24 सप्टेंबर रोजी थायलंडविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे.

ग्रुप स्टेजमधील भारताचा हा दुसरा आणि शेवटचा सामना असेल. या सामन्यात चांगली कामगिरी करुन विजय मिळवणे संघासाठी महत्त्वाचे असेल.

दुसरीकडे, सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष फुटबॉल संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात चीनकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

आता आशालता देवींच्या नेतृत्वाखालील महिला फुटबॉल संघालाही हाच निकाल पाहावा लागला. या सामन्यात भारतीय संघ पहिली 60 मिनिटे आघाडीवर होता.

भारतीय महिला फुटबॉल संघ जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि या वर्षी जूनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीत त्यांनी बलाढ्य किर्गिस्तानचा 5-0 असा पराभव केला होता.

भारतीय महिला संघाला ब गटात चायनीज तैपेई आणि थायलंडसह स्थान देण्यात आले आहे. आता टीम इंडियाला 24 सप्टेंबरला थायलंडशी (Thailand) सामना करायचा आहे. भारतासाठी हा करो या मरोचा सामना असेल. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी थायलंडविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे.

पाच गटांतील अव्वल संघ आणि प्रत्येक गटातील तीन सर्वोत्तम उपविजेत्या संघांना उपांत्यपूर्व फेरीसाठी म्हणजेच अंतिम आठसाठी पात्र ठरण्याची संधी मिळेल. गेल्या वेळी 2018 च्या आशियाई स्पर्धेत टीम इंडिया 11 संघांमध्ये नवव्या स्थानावर होती.

भारतीय संघाला यंदा आपली कामगिरी सुधारायची आहे. स्वीडनचे थॉमस डेनरबी हे भारतीय महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांच्या देखरेखीखाली नायजेरियाचा महिला संघ फिफा विश्वचषकाच्या 16 च्या फेरीत पोहोचला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT