Asian Games 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा डंका, 41 वर्षांनंतर घोडेस्वारीत 'सुवर्ण' वेध!

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 1982 नंतर पहिल्यांदाच घोडेस्वारीत सुवर्णपदक जिंकले. तिसऱ्या दिवशीही चीनच्या भूमीवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला.

Manish Jadhav

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 1982 नंतर पहिल्यांदाच घोडेस्वारीत सुवर्णपदक जिंकले आहे. तिसऱ्या दिवशीही चीनच्या भूमीवर भारताचा तिरंगा डौलाने फडकला.

या स्पर्धेत भारतीय संघाने 209.205 गुणांसह अव्वल स्थान पटकावले, तर 204.882 गुणांसह चीनने दुसरे स्थान आणि हाँगकाँगने 204.852 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. सुदीप्ती हजेला, हृदय विपुल छेडा, अनुष गरवाला आणि दिव्याकृती सिंग यांच्या टीमने या स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

खेळाडूंनी सुवर्ण जिंकल्यानंतर काही वेळातच भारताने याच क्रिडा प्रकारात वैयक्तिकमध्ये एक रौप्य पदक आणि एक कांस्य पदकही पटकावले.

घोडेस्वारीत भारताने सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक जिंकले

भारताने (India) घोडेस्वारीत 209.205 गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले. 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी भारताने नेमबाजीत एक सुवर्ण आणि महिला क्रिकेटमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकले होते.

घोडेस्वारीच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर याच प्रकारात अनुष अग्रवालाने भारतासाठी रौप्यपदक जिंकले, तर हृदय छेडाने कांस्यपदक पटकावले.

या गेममध्ये पदकाची आशा आहे

19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी असे अनेक गेम पाहायला मिळाले, ज्यात भारताने पदक जिंकले नाही, परंतु त्या दिशेने भारताने पाऊल टाकले आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताने सिंगापूरचा 16-1 अशा मोठ्या फरकाने पराभव केला.

स्क्वॉशमध्ये महिला खेळाडूंनी पाकिस्तानचा 3-0 असा पराभव केला. स्क्वॉशच्या पुरुष गटातही भारताने 3-0 असा विजय मिळवला. आता सर्वांच्या नजरा व्हॉलीबॉल गेमवर असतील, जिथे भारताचा पाचव्या स्थानासाठी पाकिस्तानशी (Pakistan) सामना होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist Places Fine: पर्यटनस्थळांची वाट लावाल तर खिशातून जातील लाखो रुपये! गोव्यात बेकायदेशीर बीच पार्टी, फेरीवाले आणि दलालांवर 1 लाखांपर्यंत दंडात्‍मक कारवाईचा कडक इशारा

Goa Drug Network Colvale Central Jail: कोलवाळ कारागृह बनले ड्रग्ज रॅकेटचे कंट्रोल रूम; आंतरराज्य जाळे, 43 लाखांचा ड्रग्ज साठा जप्त, 5 जण अटकेत

Mallikarjun Kharge Attacks Amit Shah: 'लाठीमारासाठी शहाच जबाबदार','जनता तुम्हाला बंद खोलीतून बाहेर खेचून काढेल!' मल्लिकार्जुन खर्गेंचा गृहमंत्री अमित शहांना राज्यसभेतून थेट इशारा

Goa Electricity Employees Suspended: वीज धक्क्यांमुळे मृत्यू प्रकरणांवर मोठी कारवाई!खात्यात निलंबनाचे झटके; 3 साहाय्यक अभियंत्यांसह 14 कर्मचाऱ्यांवर कारवाई

Goa POP Ganesh Idols Restrictions: यंदाही 'पीओपी'च्‍या गणेशमूर्ती रोखणे अशक्‍य; आदेशातच अनेक पळवाटांमुळे अंमलबजावणी अशक्य

SCROLL FOR NEXT