Indian Badminton Teams Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2023: भारतीय बॅडमिंटन संघाने रचला इतिहास, प्रथमच रौप्य पदक जिंकले

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. रविवारी भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने प्रथमच रौप्यपदक जिंकून इतिहास रचला.

Manish Jadhav

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. रविवारी भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने प्रथमच रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. अंतिम फेरीत त्यांचा सामना बलाढ्य चीनशी झाला.

त्यांनी अंतिम फेरीत भारताचा 3-2 असा पराभव केला. भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. टीम इंडियाने तब्बल 37 वर्षांनंतर या स्पर्धेत पदक जिंकले आहे. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने एशियाडमध्ये रौप्यपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, लक्ष्य सेनने जगातील सहाव्या क्रमांकावर असलेल्या शी युकीविरुद्धचा पहिला गेम 22-20, 14-21, 21-18 असा जिंकला.

यानंतर जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाची जोडी सात्विक आणि चिराग यांनी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाची जोडी लियांग वेई केंग आणि वांग चांग यांचा 21-15, 21-18 असा पराभव केला.

श्रीकांतचा ऑल इंग्लंड चॅम्पियन ली शिफेंगने 24-22, 21-9 असा पराभव केला. दुसऱ्या दुहेरी गेममध्ये ध्रुव कपिला आणि साई प्रतीक कृष्णा प्रसाद यांना जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या लियू यू चेन आणि यू जुआन यी यांनी 21-6, 21-15 ने पराभूत केले.

प्रणॉयच्या जागी खेळणाऱ्या मिथुन मंजुनाथला वेंग हाँग यांगने 21-12, 21-4 असे पराभूत केले. या पराभवानंतरही बॅडमिंटनमध्ये (Badminton) रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली. यापूर्वी, 2018 मध्ये पीव्ही सिंधूने महिला एकेरीत रौप्यपदक जिंकले होते.

दुसरीकडे, पुरुष बॅडमिंटन फायनलमधील सांघिक स्पर्धेतील पहिल्या एकेरीच्या सामन्यात लक्ष्य सेनने निर्णायक गेममध्ये 8-13 असे पुनरागमन करत सामना जिंकून भारताला अंतिम फेरीत दमदार सुरुवात करुन दिली होती.

लक्ष्यने चीनच्या (China) शी वाईविरुद्ध 22-20, 14-21, 21-18 असा विजय मिळवला. दुहेरीच्या सामन्यात सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पहिला गेम 21-15 आणि दुसरा गेम 21-18 असा जिंकण्यात यश मिळवले.

किदाम्बी श्रीकांतने पहिल्या गेममध्ये ली ला कडवी झुंज दिली, परंतु 22-24 असा पराभव पत्करावा लागला आणि दुसरा गेम चीनच्या ली ने 21-9 असा जिंकला. कृष्णा प्रसाद गर्ग आणि ध्रुव कपिला जोडीचा 6-21, 15-21 असा पराभव झाला.

निर्णायक सामन्यात मिथुन मंजुनाथला 0-2 ने पराभवाचा सामना करावा लागला. या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता.

भारतीय पुरुष संघाने शेवटचे 1986 मध्ये सेऊल येथे झालेल्या बॅडमिंटन सांघिक स्पर्धेत पदक जिंकले होते. त्यात प्रकाश पदुकोण आणि विमल कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

भारताने आशियाई स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 10 बॅडमिंटन पदके जिंकली आहेत, ज्यात तीन वैयक्तिक एकेरी पदके, तीन पुरुष सांघिक कांस्य, दोन महिला सांघिक कांस्य व्यतिरिक्त पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीमध्ये प्रत्येकी एक पदक यांचा समावेश आहे.

तसेच, भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने शनिवारी रोमहर्षक उपांत्य फेरीत कोरियाचा 3-2 असा पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या एचएस प्रणॉयने उपांत्य फेरीत जिओन ह्योक जिनचा 18-21, 21-16, 21-19 असा पराभव केला होता, परंतु दुखापतीमुळे तो अंतिम फेरीत उपलब्ध नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT