India Women Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे होणार पदार्पण, कधी आणि कुठे पाहाणार थरार, जाणून घ्या

Pranali Kodre

Asian Games 2023 India vs Malaysia Women Cricket Match Live Streaming Details:

आशियाई क्रीडा स्पर्धेला अधिकृतरित्या 23 सप्टेंबरपासून चीनमधील हांगझोऊ शहरात सुरू होणार आहे. पण असे असले तरी 19 सप्टेंबरपासून क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस यांसारख्या काही क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे.

क्रिकेटमध्ये महिलांच्या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. महिलांची क्रिकेट स्पर्धा 19 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 दरम्यान खेळवली जाणार आहे. तसेच पुरुषांची क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच सामील होणार आहे. पण असे असले तरी ही भारतीय महिला क्रिकेट संघाची मल्टी-स्पोर्ट्स स्पर्धेत सहभागी होण्याची दुसरी वेळ आहे. यापूर्वी गेल्यावर्षी राष्ट्रकूल स्पर्धेत भारतीय महिला संघाने रौप्य पदक जिंकले होते.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळायचे आहे. भारताचा उपांत्य फेरीतील सामना मलेशियाविरुद्ध 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना जिंकल्यास भारतीय महिला संघ उपांत्य सामन्यात प्रवेश करेल. जर भारताने उपांत्य सामन्यात प्रवेश केला, तर 24 सप्टेंबर रोजी हा सामना होईल.

दरम्यान, भारतीय महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे देण्यात आले असले तरी, काही महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये पंचांविरुद्ध झालेल्या वादाप्रकरणी आयसीसीने तिच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे ती मलेशियाविरुद्ध सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे स्मृती मानधना या सामन्यात नेतृत्व करताना दिसू शकते.

भारत विरुद्ध मलेशिया महिला संघातील सामन्याचा तपशील

  • आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारत विरुद्ध मलेशिया महिला संघातील सामन्याची वेळ आणि ठिकाण -

    आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारत विरुद्ध मलेशिया महिला संघातील सामना 21 सप्टेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे. हा सामना झेजियांग युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी पिंगफेंग क्रिकेट फिल्ड येथे खेळवला जाणार आहे.

  • आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारत विरुद्ध मलेशिया महिला संघातील सामना टीव्ही आणि ऑनलाईन कसा पाहाणार?

    आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारत विरुद्ध मलेशिया महिला संघातील सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स 1, सोनी स्पोर्ट्स 2 आणि सोनी स्पोट्स 4 या चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपित केला जाणार आहे. तसेच सोनी लिव्ह (SonyLIV) ऍपवर आणि वेबसाईटवर ऑनलाईन सामना पाहाता येणार आहे.

  • आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, तितास साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री (यष्टीरक्षक) , अनुषा बरेड्डी , पूजा वस्त्राकर

    राखीव खेळाडू - हर्लिन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT