Team India Dainik Gomantak
क्रीडा

Asian Champions Trophy: चेन्नईत भारत-पाकिस्तान महामुकाबला! कधी अन् केव्हा रंगणार हॉकीचा थरार, जाणून घ्या सर्वकाही...

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हॉकी संघात आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेत अखेरचा साखळी सामना रंगणार आहे.

Pranali Kodre

Asian Champions Trophy Hockey India vs Pakistan: भारतात सध्या आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धा चेन्नईमध्ये खेळवली जात आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाचा या स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

भारताने यापूर्वीच उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. तसेच पाकिस्तानचे स्थान मात्र अद्याप उपांत्य फेरीत निश्चित नाही.

भारतीय संघ या स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजित राहिला आहे. भारतीय संघाने पहिल्या चार साखळी सामन्यांपैकी ३ सामने जिंकले आहेत आणि १ सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे भारतीय संघ १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे.

तसेच पाकिस्तान संघाचे ५ गुण आहेत. त्यांना पहिल्या चार साखळी सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळला असून, त्यांनी १ पराभव स्विकारला आहे. तसेच २ सामने बरोबरीत सुटला आहे.

आमने-सामने आकडेवारी

भारतील संघ सध्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान 16 व्या क्रमांकावर आहेत. गेल्या 15 सामन्यांमध्ये भारतीय संघाने 12 सामने जिंकले आहेत. तसेच 2 सामने बरोबरीत सुटले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

याशिवाय पाकिस्तानने भारताला गेल्या 7 वर्षात पराभूत केलेले नाही. यापूर्वी पाकिस्तानने भारताला अखेरचे 2016 साली गुवाहाटीला झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत केले होते.

तसेच या दोन संघात अखेरचा सामना 2022 च्या आशिया कप स्पर्धेत झाला होता. ज्यात 1-1 अशी बरोबरी झाली होती. या वर्षातील ही या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील पहिलाच सामना असणार आहे.

कुठे पाहाणार सामना?

हा सामना चेन्नईमधील मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना चाहते स्टार स्पोर्ट्स आणि फॅन कोड यावर लाईव्ह पाहू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

SCROLL FOR NEXT