India vs Nepal Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NEP: नेपाळच्या लढाऊ वृत्तीचं टीम इंडियाकडून कौतुक, 'या' खेळाडूंचा मेडल देऊन सन्मान; पाहा Video

Asia Cup: भारतीय संघाने नेपाळविरुद्ध विजय मिळवला असला, तरी संघातील खेळाडूंनी दाखवलेल्या लढाऊ वृत्तीचे कौतुक करत त्यांचा सन्मान केला आहे.

Pranali Kodre

Asia Cup 2023 India vs Nepal sportsman Spirit Video:

भारत विरुद्ध नेपाळ संघात आशिया चषकातील साखळी फेरीतील सामना सोमवारी (4 सप्टेंबर) पार पडला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

या विजयासह रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सुपर-4 फेरीतील प्रवेशही पक्का केला. पण असे असले तरी या सामन्यात नेपाळ संघाने दाखवलेल्या लढाऊ वृत्तीने मात्र सर्वांची वाहवा मिळवली.

दरम्यान, भारतीय संघातील खेळाडूंनी नेपाळविरुद्ध सामना जिंकण्याबरोबरच भारत आणि नेपाळ मधील चाहत्यांचीही त्यांच्या खिलाडूवृत्तीने मनं जिंकली आहेत.

झाले असे की सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये भारतीय संघ आणि नेपाळ संघ एकत्र आले. यावेळी भारताच्या खेळाडूंनी या सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या नेपाळच्या काही खेळाडूंचा गौरव केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की विराट कोहली, हार्दिक पंड्या या खेळाडूंबरोबरच भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने नेपाळच्या तीन खेळाडूंना पदक देऊन गौरव केला.यावेळी नेपाळचे प्रशिक्षक माँटी देसाई यांनी या खेळाडूंचे कौतुक केले.

देसाई यांनी सर्वात आधी हार्दिक पंड्या याला सोमपाल कामीला पदक देण्यास सांगितले. सोमपाल कामीने भारताविरुद्ध 56 चेंडूत एक चौकार आणि 2 षटकारांसह 48 धावांची खेळी केली होती.

त्यानंतर असिफ शेखाल विराट कोहलीने पदक दिले. असिफने भारताविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. त्याने नेपाळकडून सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. त्याला पदक देत असताना देसाई यांनी असेही सांगितले की विराट असिफचा आदर्श आहे.

विशेष गोष्ट अशी की या सामन्यात विराटकडून दुसऱ्या षटकात असिफचा झेल सुटला होता. मात्र, 30 व्या षटकात विराटनेच अर्धशतकी खेळी करणाऱ्या असिफला एका हाताने शानदार झेल घेत बाद केले होते.

दरम्यान, तिसरे पदक द्रविडने दिपेंद्र सिंग ऐरेला दिले. देसाई यांनी सांगितले की दिपेंद्रने क्षेत्ररक्षणात चमक दाखवली. दरम्यान, या पदक प्रदान कार्यक्रमात काही गमतीशीर संवादही झाल्याचे दिसले.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की वनडे क्रिकेटमधील भारत आणि नेपाळ यांच्यातील हा पहिलाच सामना होता. नेपाळ हा वनडेमधील भारताचा 20 वा प्रतिस्पर्धी संघ ठरला. यापूर्वी भारताने 19 संघांविरुद्ध वनडे सामने खेळले आहेत.

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास, भारताने नाणेफेक जिंकून नेपाळला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 48.2 षटकात सर्वबाद 230 धावा केल्या होत्या. पण पावसाच्या व्यत्ययामुळे भारतासमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 23 षटकात 145 धावांचे आव्हान ठेवण्यात आले.

या आव्हानाचा पाठलाग भारताने 20.1 षटकात एकही विकेट न गमावता 147 धावा करत पूर्ण केला. भारताकडून रोहित शर्माने 74 धावांची आणि शुभमन गिलने 67 धावांची नाबाद खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT