Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NEP: 'गोलंदाजी ठिक आहे, पण क्षेत्ररक्षणही...', नेपाळविरुद्धच्या विजयानंतरही कर्णधार रोहित नाराज

Rohit Sharma: भारताने सोमवारी आशिया चषक स्पर्धेत नेपाळविरुद्ध 10 विकेट्सने विजय मिळवला असला, तरी कर्णधार रोहितने सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हटले.

Pranali Kodre

Rohit Sharma on India vs Nepal match in Asia Cup 2023:

आशिया चषक 2023 स्पर्धेत सोमवारी (4 सप्टेंबर) भारत आणि नेपाळ संघात कँडीमधील पाल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर सामना झाला. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात भारताने 10 विकेट्सने विजय मिळवला.

भारताच्या विजयात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी मोलाचा वाटा उचलला. त्यांनी नाबाद अर्धशतके केली. दरम्यान असे असले तरी रोहितने या सामन्यात झालेल्या काही चूकांबद्दल खंत व्यक्त केली.

सामन्यानंतर रोहितने त्याच्या फलंदाजीबद्दलही भाष्य केले, यावेळी त्याने मारलेल्या फ्लिक शॉटबद्दलही त्याने प्रतिक्रिया दिली.

तो म्हणाला, 'माझ्या खेळीबद्दल फारसा खूश नाही. सुरुवात चांगली झाली नाही, पण माझी नजर स्थिर झाल्यानंतर मला संघाला जिंकवायचे होते. फ्लिक-स्विप कोणत्याही हेतूने मारला नव्हता, मला फक्त शॉर्ट फाईनच्या दिशेला मारायचे होते, पण सध्याच्या काळातील बॅट खूप चांगल्या आहेत.'

आशिया चषक स्पर्धा वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या दृष्टीनेही महत्त्वाची समजली जात आहे. तसेच मंगळवारी भारताचा वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी संघ जाहीर होणार आहे.

याबद्दल रोहितने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, 'जेव्हा आम्ही येथे खेळायला आलो, तेव्हा आम्हाला माहित होते की वर्ल्डकपसाठी आमचा 15 जणांचा संघ कसा असू शकतो.'

'आशिया चषक आम्हाला मोठे चित्र दाखवणार नव्हते, कारण साखळी फेरीचे दोनच सामने होते. पण सुदैवाने पहिल्या सामन्यात आम्हाला फलंदाजीची संधी मिळाली आणि या सामन्यात गोलंदाजीची संधी मिळाली. पण तरी आम्हाला बरेच काम करावे लागणार आहे.'

भारताने साखळी फेरीतील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारताने 48.5 षटकात सर्वबाद 266 धावा केल्यानंतर पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे सामना रद्द झाला होता.

दरम्यान, नेपाळविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवला असला, तरी भारताचे क्षेत्ररक्षण ढिसाळ झाले होते. भारताकडून अनेक झेल या सामन्यात सुटले, यावरही काम करण्याची गरज असल्याचे रोहितने सांगितले.

रोहित म्हणाला, 'अनेक खेळाडू दुखापतीनंतर पुनरागमन करत आहेत. त्यांना त्यांच्या लयीत येण्यासाठी त्यांचा वेळ लागणार आहे. हार्दिक पंड्या आणि इशान किशन यांनी मागील सामन्यात शानदार कामगिरी केलेली. या सामन्यात गोलंदाजी ठिक होती, पण क्षेत्ररक्षण खराब झाले, त्यात सुधारणा करण्याची गरज आहे.'

सोमवारी झालेल्या सामन्यात नेपाळने 48.2 षटकात सर्वबाद 230 धावा केल्या होत्या. पण पावसाच्या व्यत्ययामुळे भारतासमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 23 षटकात 145 धावांचे आव्हान ठेवण्यात आले.

या आव्हानाचा पाठलाग भारताने 20.1 षटकात एकही विकेट न गमावता 147 धावा करत पूर्ण केला. भारताकडून रोहित शर्माने 74 धावांची आणि शुभमन गिलने 67 धावांची नाबाद खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT