India vs Nepal  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NEP सामन्यावरही पडणार पावसाचे पाणी? मॅच रद्द झाल्यास कसं असणार सुपर-4 चे समीकरण

Asia Cup 2023: आशिया चषकात भारत आणि नेपाळ यांच्यात सोमवारी सामना रंगणार असून या सामन्यावेळी हवामान अंदाज कसे असणार आहेत, जाणून घ्या.

Pranali Kodre

Asia Cup 2023 India vs Nepal Kandya Weather Update:

आशिया चषक २०२३ स्पर्धेत सोमवारी भारत विरुद्ध नेपाळ संघात साखळी फेरीचा सामना रंगणार आहे. श्रीलंकेतील कँडीमधील पाल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. अ गटातील हा अखेरचा साखळी सामना आहे.

दरम्यान, या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. Accuweatherच्या हवामान अंदाजानुसार सोमवारी पूर्णपणे ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच काही वेळ पाऊसही पडू शकतो. दरम्यान बहुतांश सामन्याच्या वेळेदरम्यान ढगाळ वातावरणच अधिक असेल.

त्यामुळे जर पावसाचा सामन्यादरम्यान मोठा अडथळा आल्यास षटकांची संख्या कमी केली जाऊ शकते किंवा सामना रद्दही होऊ शकतो.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारताचा पाकिस्तानविरुद्धचा साखळी फेरीतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. कँडीमध्येच झालेल्या या सामन्यात भारताने पहिल्या डावात पूर्ण ५० षटके फलंदाजी केली होती. मात्र, त्यानंतर पावसामुळे सामना सुरु होऊ शकला नव्हता. तसेच नेपाळने मात्र पाकिस्तानविरुद्ध साखळी फेरीत पराभवाचा सामना केला आहे.

सुपर-४ चे कसे आहे समीकरण

अ गटातून पाकिस्तानने एक विजय आणि रद्द सामन्यानंतर ३ गुणांसह सुपर-४ फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यामुळे आता सोमवारी होणाऱ्या भारत आणि नेपाळ सामन्यानंतर अ गटातून सुपर ४ फेरीत प्रवेश करणार दुसरा संघ कोणता ठरणार हे निश्चित होईल.

सध्या गुणतालिकेत नेपाळच्या खात्यात शुन्य गुण आहेत, तर भारताच्या खात्यात एका रद्द सामन्यामुळे १ गुण आहे. त्यामुळे नेपाळविरुद्धचा सामना जिंकला किंवा सामना रद्द किंवा बरोबरीत सुटला, तरी भारतीय संघ सुपर-४ फेरीत प्रवेश करेल. कारण विजय मिळवल्यास भारताचे ३ गुण होतील, तसेच जर सामना रद्द किंवा बरोबरीत सुटला, तर २ गुण होती.

मात्र, सुपर - ४ फेरीत जाण्यासाठी नेपाळला विजयाचीच आवश्यकता आहे. जर नेपाळने विजय मिळवला, तर त्यांचे २ गुण होतील आणि ते सहज सुपर-४ मध्ये जातील. मात्र सामना पराभूत झाला, तर त्यांच्या खात्यात शुन्य गुण राहतील. तसेच सामना रद्द किंवा बरोबरीत सुटला तर त्यांना एकच गुण मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT