Javagal Srinath Dainik Gomantak
क्रीडा

India vs Nepal सामना 'म्हैसूर एक्सप्रेस'साठी ऐतिहासिक! श्रीनाथ 'ही' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Pranali Kodre

Asia Cup 2023 India vs Nepal Javagal Srinath record as a match referee:

आशिया चषक 2023 स्पर्धेत सोमवारी नेपाळ आणि भारत संघात साखळी फेरीतील अखेरचा सामना झाला. श्रीलंकेतील कँडीमधील पाल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात भारताचे माजी क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ यांनी खास विक्रम केला आहे.

श्रीनाथ यांनी क्रिकेटपटू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर सामनाधिकारी म्हणून आपली कारकिर्द सुरु केली होती. आता त्यांनी या कारकिर्दीतही महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. भारत आणि नेपाळ यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीनाथ यांनी सामनाधिकारी म्हणून काम पाहिले. हा त्यांचा सामनाधिकारी म्हणून 250 वा वनडे सामना ठरला.

54 वर्षीय श्रीनाथ 250 वनडे सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम पाहाणारे भारताचे पहिलेच, तर जगातील चौथे सामनाधिकारी ठरले आहेत. त्यांच्यापूर्वी रंजन मदुगाले, ख्रिस ब्रॉड आणि जेफ क्रोवे यांनी वनडेत 250 सामन्यांहून अधिक सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

या विक्रमाबद्दल श्रीनाथ म्हणाले, 'सामनाधिकारी म्हणून या मैलाच्या दगडापर्यंत पोहचणे आनंददायी आहे. या कारकिर्दीला आता 18 वर्षे झाले आहेत आणि हे अविश्वसनीय आहे की मी खेळलेल्या वनडे सामन्यांपेक्षा अधिक सामन्यांमध्ये अधिकारी होतो.'

'माझ्यासाठी हा सन्मान आहे की मी अजूनही सामनाधिकारी म्हणून कार्यरत आहे. साल २००६ मध्ये कोलंबो येथे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यातून सामनाधिकारी म्हणून आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून माझा प्रवास शानदार झाला आहे आणि येत्या काही वर्षात मी आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.'

श्रीनाथ यांनी २००३ साली खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर 2006 मध्ये त्यांनी सामनाधिकारी म्हणून काम सुरू केले. त्यांनी 2007 वनडे वर्ल्डकप, 2009 आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2012, 2014, 2016 आणि 2021 टी20 वर्ल्डकप अशा महत्त्वाच्या स्पर्धांमध्येही सामनाधिकारी म्हणून काम केले.

श्रीनाथ यांनी सामनाधिकारी म्हणून 250 वनडे व्यतिरिक्त 65 कसोटी सामन्यांत, 118 पुरुष आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत आणि 16 महिला आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात काम पाहिले आहे.

जवागल श्रीनाथ यांची खेळाडू म्हणून कारकिर्द

वेगवान गोलंदाज असलेल्या जवागल श्रीनाथ यांनी खेळाडू म्हणून भारताकडून 1991 साली पदार्पण केले होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 67 कसोटी सामने खेळले आहेत. यात 236 विकेट्स घेतल्या, तसेच फलंदाजी करताना 1009 धावा केल्या. याशिवाय 229 वनडे सामने खेळले, ज्यात त्यांनी 315 विकेट्स घेतल्या आणि 883 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT