Team India Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: श्रीलंकेचा 129 चेंडूत पराभव करत टीम इंडियाने रचला विक्रमांचा मनोरा, पाहा कोणते केले पराक्रम

India vs Sri Lanka: भारतीय संघाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत अनेक विक्रम नावावर केले.

Pranali Kodre

Asia Cup 2023 Final, India vs Sri Lanka Records:

भारतीय संघाने रविवारी (17 सप्टेंबर) आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला 10 विकेट्सने पराभूत केले. यासह भारताने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. त्याचबरोबर भारतीय संघाने अनेक विक्रम या सामन्यात केले आहेत.

भारताने केवळ 129 चेंडूत अंतिम सामन्यातील विजय संपादन केला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांचा डाव 15.2 षटकातच 50 धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेकडून कुशल मेंडिस (17) आणि दुशन हेमंता (13) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.

भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. यातील 4 विकेट्स त्याने चौथ्याच षटकात घेतल्या होत्या. तसेच हार्दिक पंड्याने 3 विकेट्स आणि जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली.

त्यानंतर भारताने 51 धावांचे आव्हान अवघ्या 6.1 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले. भारताकडून इशान किशन 23 धावांवर आणि शुभमन गिल 27 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे भारताने तब्बल 263 चेंडू बाकी ठेवून विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने केलेल्या विक्रमांवर एक नजर टाकूया.

सर्वाधिक वेळा आशिया चषक जिंकणारे संघ

  • 8 वेळा - भारत

  • 6 वेळा - श्रीलंका

  • 2 वेळा - भारत

चेंडूच्या तुलनेत भारताचे वनडेतील सर्वात मोठे विजय

  • 263 चेंडू राखून - विरुद्ध श्रीलंका - कोलंबो, 2023

  • 231 चेंडू राखून - विरुद्ध केनिया - ब्लोएमफॉन्टेन, 2001

  • 211 चेंडू राखून - विरुद्ध वेस्ट इंडिज - तिरुअनंतपुरम, 2018

  • 188 चेंडू राखून - विरुद्ध इंग्लंड - द ओव्हल, 2022

चेंडूच्या तुलनेतील सर्वात लहान वनडे सामने

  • 104 चेंडू - नेपाळ विरुद्ध अमेरिका, किर्तीपूर, 2020

  • 120 चेंडू - श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे, कोलंबो, 2001

  • 129 चेंडू - भारत विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, 2023

वनडे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 10 विकेट्सने विजय मिळणारे संघ

  • भारत - विरुद्ध झिम्बाब्वे, शारजाह, 1998

  • ऑस्ट्रेलिया - विरुद्ध इंग्लंड, सिडनी, 2003

  • भारत - विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, 2023

आशिया चषकात एका डावात सर्व विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतलेले वनडे

  • पाकिस्तान विरुद्ध भारत, कँडी, 2023

  • भारत विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, 2023

वनडे स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील सर्वात निचांकी धावसंख्या

  • 50 धावा - श्रीलंका विरुद्ध भारत, कोलंबो, 2023

  • 54 धावा - भारत विरुद्ध श्रीलंका, शारजाह, 2000

  • 78 धावा - श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, शारजाह, 2002

  • 81 धावा - ओमान विरुद्ध नामिबिया, विंढोक, 2019

  • 140 धावा - श्रीलंका विरुद्ध कॅनडा, पार्ल, 2003

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT