Rohit Sharma & Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2022: भारत अन् पाकिस्तान व्यतिरिक्त कोणत्याही संघाची घोषणा नाही

Asia Cup: आशिया कप 2022 यूएईमध्ये 27 ऑगस्टपासून सुरु होत आहे.

दैनिक गोमन्तक

Asia Cup 2022: आशिया कप 2022 यूएईमध्ये 27 ऑगस्टपासून सुरु होत आहे. यापूर्वी या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडे होते, मात्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या या देशाने आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद नाकारले. आता यूएईला सलग दुसऱ्यांदा यजमानपद मिळाले आहे. यापूर्वी 2018 मध्ये UAE या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या बहुराष्ट्रीय स्पर्धेत भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ सहभागी होत आहेत. तर एक संघ आशिया चषक पात्रता 2022 मध्ये प्रवेश करेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया चषक 2022 साठी सर्व संघांना त्यांचे संघ घोषित करण्यासाठी 8 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती, परंतु आतापर्यंत भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) वगळता इतर कोणत्याही संघाने आपला संघ जाहीर केलेला नाही.

भारत - रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अवेश खान

स्टॅंडबाय: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चाहर

पाकिस्तान - बाबर आजम (कप्तान), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर

  • अफगाणिस्तान : संघ अद्याप जाहीर झालेला नाही

  • बांगलादेश : संघ अद्याप जाहीर झालेला नाही

  • श्रीलंका : संघ अद्याप जाहीर झालेला नाही

आशिया चषक 2022 चे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे-

  • पहिला सामना - 27 ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - दुबई

  • दुसरा सामना - 28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान - दुबई

  • तिसरा सामना - 30 ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - शारजा

  • चौथा सामना - ३१ ऑगस्ट - क्वालिफायर विरुद्ध भारत - दुबई

  • पाचवा सामना - 1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश - दुबई

  • 6 वा सामना - 2 सप्टेंबर - क्वालिफायर विरुद्ध पाकिस्तान - शारजा

  • सामना 7 - 3 सप्टेंबर - B1 विरुद्ध B2 - शारजाह

  • सामना 8 - 4 सप्टेंबर - A1 वि A2 - दुबई

  • सामना 9 - 6 सप्टेंबर - A1 विरुद्ध B1 - दुबई

  • सामना 10 - 7 सप्टेंबर - A2 विरुद्ध B2 - दुबई

  • 11 वा सामना - 8 सप्टेंबर - A1 विरुद्ध B2 - दुबई

  • सामना 12 - 9 सप्टेंबर - B1 वि A2 - दुबई

  • अंतिम सामना - 11 सप्टेंबर - 1ला सुपर 4 विरुद्ध दुसरा सुपर 4 संघ - दुबई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

SCROLL FOR NEXT