Kashyap Bakhale and Rahul Mehta
Kashyap Bakhale and Rahul Mehta Dainik Gomantak
क्रीडा

CK Nayudu Trophy : अरुणाचलच्या गोलंदाजीवर गोव्याचे वर्चस्व; राहुल मेहता, कश्यप बखले शतकवीर

किशोर पेटकर

CK Nayudu Trophy : कर्नल सी. के. नायडू करंडक 25 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत मोसमातील पहिलाच सामना खेळणारा राहुल मेहता, तसेच कश्यप बखले यांच्या शानदार शतकांच्या बळावर गोव्याने कमजोर अरुणाचल प्रदेशवर वर्चस्व राखले.

यजमान संघाने पहिल्या दिवसअखेर रविवारी 4 बाद 363 धावा केल्या. राहुल मेहताने 107 धावा केल्या, तर मोसमातील दुसरे शतक केलेला कश्यप 141 धावांवर खेळत आहे. राहुलने 160 चेंडूंतील खेळीत 20 चौकार व एक षटकार मारला. कश्यपने 247 चेंडूंतील खेळीत चेंडू 19 वेळा सीमापार केला.

चार दिवसीय सामन्याला रविवारपासून सांगे येथील जीसीए क्रिकेट मैदानावर सुरवात झाली. रणजी संघातून थेट दाखल झालेला सलामीचा मंथन खुटकर (19) राहुलसमवेत 51 धावांची सलामी दिल्यानंतर बाद झाला. त्याने ऑफस्पिनर लेकी त्सेरिंग याच्या गोलंदाजीवर शुहेल अन्सारीकडे झेल दिला.

त्यानंतर राहुलने कश्यपच्या साथीत अरुणाचलच्या अननुभवी गोलंदाजीस दाद दिली नाही. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 180 धावांची भागीदारी केली. राहुलला शतकानंतर लगेच डावखुरा फिरकी गोलंदाज श्रावण कुमार याने पायचीत बाद केले.

कर्णधार दीपराज गावकर व कश्यप यांनी तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. रणजी संघातून थेट खेळण्यास आलेला दीपराज अर्धशतकानंतर मध्यमगती गोलंदाज आर्यन साहानी याच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 72 चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने 59 धावा केल्या.

पुढच्याच चेंडूवर छत्तीसगडविरुद्ध शानदार 80 धावा केलेल्या योगेश कवठणकर याला आर्यनने पायचीत बाद केल्यामुळे गोव्याला धक्का बसला, मात्र दिवसअखेर कश्यपने वासू तिवारीच्या साथीत संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : 93 षटकांत 4 बाद 363 (राहुल मेहता 107, मंथन खुटकर 19, कश्यप बखले नाबाद 141, दीपराज गावकर 59, योगेश कवठणकर 0, वासू तिवारी नाबाद 23, आर्यन साहानी 2-44, श्रावण कुमार 1-73, लेकी त्सेरिंग 1-52).

दृष्टिक्षेपात...

- कश्यप बखले याची यंदा स्पर्धेत 2 शतके, यापूर्वी बिहारविरुद्ध 108 धावा

- स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात राहुल मेहताचे शतक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT