Arjun Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Arjun Tendulkar: गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जून तेंडुलकरचे सिक्ससह 'अर्धशतक', सचिनचा रेकॉर्ड रडारवर

अर्जून तेंडुलकरने पहिल्याच प्रथम श्रेणी सामन्यात अर्धशतक झळकावले आहे.

Pranali Kodre

Ranji Trophy 2022-23: रणजी ट्रॉफीचा नवा हंगाम मंगळवारपासून सुरू झाला असून अर्जून तेंडुलकरने यंदा गोव्याच्या संघाकडून खेळत आहे. यासह त्याने राजस्थानविरुद्ध गोव्याकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही पदार्पण केले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या पदार्पणाची सुरुवातही शानदार झाली आहे.

त्याने बुधवारी राजस्थानविरुद्ध पहिल्याच डावात 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत अर्धशतक झळकावले. त्याने षटकारासह 52 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. तो सामन्याची दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपले, तेव्हाही नाबाद खेळत होता.

दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा असलेल्या अर्जूनने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेरीसपर्यंत 121 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 10 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे.

तसेच त्याने या सामन्यात शतकी खेळी केलेल्या सुयश प्रभूदेसाईबरोबर नाबाद 119 धावांची भागीदारीही केली आहे. प्रभूदेसाई 292 चेंडूत 128 धावांवर नाबाद आहे. तसेच गोव्याने 117 षटकांत 5 बाद 320 धावा केल्या आहेत.

सचिनचा विक्रम रडारवर

सचिन तेंडुलकरनेही 34 वर्षांपूर्वी डिसेंबरमध्येच गुजरातविरुद्ध मुंबईकडून पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. त्यावेळी त्यानेही पहिल्याच डावात शतक केले होते. तेव्हा तो केवळ 15 वर्षांचा असल्याने असा कारनामा करणारा सर्वात युवा क्रिकेटपटूही ठरला होता.

सचिनने त्यावेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 129 चेंडूत शतक पूर्ण केले होते. त्याने नाबाद 100 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 12 चौकार ठोकले होते. पण हा सामना अनिर्णित राहिला होता. सचिनला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.

आता 23 वर्षीय अर्जूनलाही पहिल्याच प्रथम श्रेणी सामन्यात शतकी खेळी करण्याची संधी आहे.

अर्जून हा प्रामुख्याने अष्टपैलू खेळाडू आहे. तो डाव्या हातानेच फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी करतो. यापूर्वी अर्जून मुंबई संघात होता. मात्र तिथे त्याला संधी मिळत नसल्याने त्याने यावर्षी गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT