Lionel Messi  Dainik Gomantak
क्रीडा

Argentina vs Australia: मेस्सीचा 1000 व्या सामन्यात गोल अन् अर्जेंटिनाची क्वार्टर-फायनलमध्ये धडक

फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेळ केला आहे.

Pranali Kodre

Argentina vs Australia: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील बाद फेरींना सुरुवात झाली असून उपउपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारी रात्री झाला. या सामन्यात अर्जेंटिनाने 2-1 अशा गोलफरकाने विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता अर्जेंटिनाचा उपांत्यपूर्व सामना नेदरलँड्स विरुद्ध 9 डिसेंबरला रात्री होईल.

शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा बचाव चांगलाच भक्कम भासत होता. पण मेस्सीने (Lionel Messi) त्याच्या कौशल्याच्या जोरावर अर्जेंटिनाला (Argentina) पहिला गोल करून दिला. त्याने 35 व्या मिनिटाला हा गोल केला. त्याच्यानंतर ज्युलियन अल्वारेझने 57 व्या मिनिटाला दुसरा गोल करत अर्जेंटिनाची आघाडी वाढवली.

पण सामन्याच्या 77 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडेझकडून स्वयं गोल झाल्याने ही आघाडी कमी केली होती. पण नंतर ऑस्ट्रेलियाला (Australia) गोल साधता आला नाही आणि अर्जेंटिनाने हा सामना जिंकला. त्याचबरोबर दहाव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

विशेष असे की मेस्सीसाठी हा त्याचा कारकिर्दीतील 1000 वा सामना होता आणि 789 वा गोल होता. तसेच फिफा वर्ल्डकपमधील 9 वा गोल होता. त्यामुळे फिफा वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या अर्जेंटियन फुटबॉलपटूंमध्ये दिआगो मॅरेडोना यांच्या 8 गोलला मागे टाकले आहे. तसेच मेस्सी वर्ल्डकपमध्ये (FIFA World Cup 2022) गोल करणारा अर्जेंटिनाचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. शनिवारी त्याचे वय 35 वर्षे 162 दिवस इतके होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

SCROLL FOR NEXT