Virat Kohli & Rohit Sharma

 

Dainik Gomantak 

क्रीडा

YEAR END: टीम इंडियामध्ये दोन कर्णधारांची नियुक्ती, भारतीय क्रिकेटने बदलला इतिहास

भारतीय क्रिकेट (Indian Cricket) इतिहासातील सर्वात मोठी घटना 2021 मध्ये घडली आहे. विशेष म्हणजे एका नव्या परंपरेची सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट (Indian Cricket) इतिहासातील सर्वात मोठी घटना 2021 मध्ये घडली आहे. विशेष म्हणजे एका नव्या परंपरेची सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधार पदाच्या जबाबदारीची विभागणी करण्यात यावी अशी चर्चा मागील बर्‍याच दिवसांपासून सुरु होती. परंतु तसे होताना दिसत नव्हते. अशा परिस्थितीत एका खेळाडूवर कर्णधारपदाचा भार टाकण्यापेक्षा संघात दोन कर्णधार असणे अधिक चांगले. याचा अर्थ संघात कामाची विभागणी होईल आणि ज्याला कर्णधारपद दिले जाईल तो आपल्या खेळावरही अधिक लक्ष केंद्रित करु शकेल.

दोन कर्णधार नेमण्याच्या परंपरेची सुरुवात

2021 मध्ये, रोहित शर्माला (Rohit Sharma) पूर्णपणे मर्यादित फॉरमॅटचा कर्णधार बनवण्यापर्यंत, कर्णधारपदाची संपूर्ण जबाबदारी विराट कोहलीच्या (Virat Kohli) खांद्यावर होती. मात्र याचा परिणाम कोहलीच्या कामगिरीवरही झालेला पाहायला मिळाला. ही विराटची खंत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना जाणवली असावी. त्यामुळे टीम सिलेक्टरसोबत असा निर्णय घेतला ज्याचा भारतीय क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच कोणी याचा विचार केला असेल.

2021 च्या टी20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) जेव्हा विराट कोहलीने टी20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली, तेव्हा कदाचित आता संघात दोन कर्णधार नेमण्याची गरज भासली असेल. 2021 च्या टी20 विश्वचषकानंतर विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. यानंतर, जेव्हा संघ दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर क्रिकेट मालिका खेळण्यासाठी जाणार होता, ज्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील होती. त्याआधीच रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद पूर्णपणे सोपवण्यात आले होते. म्हणजेच विराट कोहली आता कसोटी फॉरमॅटचे तर रोहित शर्मा वनडे आणि टी-20 फॉरमॅटचे नेतृत्व करणार आहे. 2021 हे वर्ष यासाठी नेहमीच स्मरणात राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kokum Farming: राज्यात कोकम उत्पादनात 40 टक्के घट! फळधारणेला उशीर; हवामान बदलांचा शेतकऱ्यांना फटका

चिता रचली, हंबरडा फुटला.., पण ते होते चित्रपटाचे शूटिंग; साल्वादोर पंचायत क्षेत्रातील घटना, पंचायतीला उशिरा जाग; अनेक जण संभ्रमात

पाकिस्तानी लष्कराच्या तळावर आत्मघाती स्फोट अन् गोळीबाराचा थरार! 15 सैनिकांचा मृत्यू; 'टीटीपी'नं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

Goa weather alert: राज्यात उन्हाचा तडाखा वाढला! रात्रीचा पाराही चढला; पुढील काही दिवस उष्म्यातून सुटका नाही

Ketan Bhatikar Pass Away: जनसेवक हरपला, गोवा हळहळला! केतन भाटीकरांचा सर्पदंशानं मृत्यू, आमदारकीचं स्वप्न राहिलं अधुरं; पण, अखेरपर्यंत केली समाजसेवा

SCROLL FOR NEXT